Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपाशीपोटी उन्हात राहिल्यामुळेच मृत्यू

खारघर दुर्घटना ः शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट

मुंबई/प्रतिनिधी ः खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र उष्माघाताने म

नौदलाच्या नव्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा
फसव्या जाहिराती आणि ग्राहक
उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकर धडकून अग्नितांडव!

मुंबई/प्रतिनिधी ः खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र उष्माघाताने मृत्यू झाला की, चेंगराचेंगरीमुळे, यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून तर्क-वितर्क लढवण्यात येत आहे. मात्र गुरूवारी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, 14 पैकी 12 जण 7 तासापासून उपाशी असल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील खारघर येथील भव्य मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. लाखों लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. मात्र या पुरस्काराला गालबोट लागले. पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केल्याने 14 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांना भरउन्हात तब्बल चार-पाच तास बसावे लागले. यामध्ये 14 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. रणरणत्या उन्ह्यात उपाशीपोटी बसून राहिल्यानेच त्यांची प्रकृती खालावल्याचे या अहवालातून समोर आले आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा आरोप काल केला. त्यांनी तसा व्हिडिओही पोस्ट केला. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुन्हा एकदा यावरून आरोप-प्रत्यारोपाला धार चढणार असल्याचे दिसते. नवी मुंबईतल्या खारघर येथे डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. मात्र, या सोहळ्यात आलेल्या 14 श्री सेवकांचा मृत्यू झाला. मृतात दहा महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. उष्माघाताने हे मृत्यू झाल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला. या मृतांचे शवविच्छेदन अहवाल आलेत. त्यात बारा मृत साता तासांपासून उपाशी असल्याचे समोर आले आहे. अनेकांना विविध व्याधी होत्यात. त्यात उन्हाचा फटका. त्यामुळे हे मृत्यू झाल्याचे समजते.
दरम्यान, विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात येत होते. कार्यक्रम संपल्यानंतर एकाच वेळी घरी जाण्यासाठी श्रीसदस्यांची गर्दी उसळली आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती बाहेर पडेपर्यंत पोलिसांनी रस्ते अडवून ठेवले होते. त्यामुळे गर्दीत धक्काबुक्की झाल्याचा आरोप या चित्रफितींच्या आधारे करण्यात आला आहे. जागरण, सकाळपासून घडलेला उपास आणि उष्माघात यामध्ये चेंगराचेंगरीची भर पडल्यामुळे हलगर्जीपणा, नियोजनातील ढिसाळपणाही दुर्घटनेला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

वस्तूस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती – खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल.भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.

COMMENTS