बोकड कापण्याच्या सुर्‍याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोकड कापण्याच्या सुर्‍याने तरुणावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे बोकड कापण्याच्या कारणावरून चार आरोपीने संगनमत करून सलमान सय्यद या तरूणाला बोकड कापण्याच्या सुर्‍य

कट मारल्यावरून चौघांकडून पिता पुत्रास फायटरने बेदम मारहाण
नगरमध्ये ओमायक्रान संशयित रुग्ण नाही ; अफवांवर विश्‍वास ठेवू नका- मनपा आयुक्त
बदलापूर घटनेचा राहुरीतील मुस्लिम महिलांकडून निषेध

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे बोकड कापण्याच्या कारणावरून चार आरोपीने संगनमत करून सलमान सय्यद या तरूणाला बोकड कापण्याच्या सुर्‍याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे घडली. याप्रकरणी सलमान नसीर सय्यद (वय 19 वर्ष, रा. कानडगाव, ता. राहुरी) या तरूणाने फिर्याद दिली असून राहुरी पोलीस ठाण्यात सलमानच्या जबाबावरून कासमभाई सत्तारभाई सय्यद, शकील कासमभाई सय्यद, हरून कासमभाई सय्यद, मोसिन कासमभाई सय्यद (सर्व रा. कानडगाव) या चारजणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 जानेवारी रोजी कानडगाव येथे आरोपी यांनी बोकड कापण्याच्या कारणावरून संगनमत केले आणि सलमान सय्यद याला बोकड कापण्याच्या सुरीने जबरदस्त मारहाण केली. या घटनेत सलमान सय्यद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी प्रवरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS