Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी फॅक्टरी परिसरात आढळला परप्रांतीय कामगाराचा मृतदेह

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील राहुरी फँक्टरी परीसरातील एका भंगार दुकानात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळून आला.सदर मृतदेह लोणी येथिल दवाखान

राज्यात गुटखाबंदीसाठी विशेष पथकाची निर्मिती करा
महात्मा गांधी व्यक्ती नसून एक विचार ः प्राचार्य बनकर
स्वाभिमानी सचिव संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश रेवगडे

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील राहुरी फँक्टरी परीसरातील एका भंगार दुकानात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळून आला.सदर मृतदेह लोणी येथिल दवाखान्यात नेण्यात आला होता.येथिल वैद्यकिय अधिकारी यांनी लोणी पोलिसांना आकस्मत मृत्यूची नोंद घेण्यासाठी पञव्यवहार केला असल्याचे समजते.त्या परप्रांतीय तरुणाचा घातपात झाल्याचा संशय येथिल नागरिकांनी व्यक्त केला आहे. परप्रांतीय तरुणाच्या मृत्यू बाबत लोणी व राहुरी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नसल्याचे खात्रीशीर माहिती ठाणे अंमलदार यांनी सांगितली असून परप्रांतीय तरुणाच्या मृत्यूची नोंद राहुरी व लोणी पोलिस ठाण्यात होवू नये यासाठी जिल्ह्यातील एका राजकीय संघटनेच्या बड्या नेत्याने मोठी आर्थिक तडजोड घडवून आणून मृतदेहाच्या प्रकरणावर पडदा टाकला असल्याची चर्चा सुरू आहे. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला की, परस्पर अंत्यविधी केला याबाबत तर्कवितर्क केले जात आहे. लोणी व राहुरी पोलिसांसह भंगार दुकान मालकाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यासाठी काही संघटनांचे पदाधिकारी वरीष्ठ अधिकार्‍यांची भेट घेवून मागणी करणार असल्याचे समजते.

             याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी फॅक्टरी येथील एका भंगार दुकानात परप्रांतीय मजुर कामाला होता. कामाच्या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आल्यावर भंगार दुकान मालकाची धावपळ उडाली आहे. मृतदेह सापडल्यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात कोणतीही कल्पना देता मृतदेह परस्पर हलविण्यात आला. संबंधित भंगार व्यावसायिकाने घडलेल्या प्रकाराबाबत कोणतीही उलट-सुलट चर्चा होऊ नये म्हणून एका खाजगी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह  लोणी येथील रुग्णालयात घेऊन गेल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. परंतु, राहुरी शहरामध्ये सर्व वैद्यकीय सुविधा व शवविच्छेदनाची सोय उपलब्ध असतांनाही लोणी येथिल रुग्णालयात मृतदेह नेण्याचे गुढ काय? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र ही घटना घडून दोन-तीन दिवस होऊनही अद्याप लोणी व राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यू गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे बोलले जात आहे. परप्रांतीय तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात तर आली नाही ना?लोणी येथिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.सदर परप्रांतीय तरुण जागेवरच मयत झालेला होता तर लोणी वैद्यकीय अधिकार्‍यांने पोलिसात खबर देवून शवविच्छेदन करुन शुन्य क्रमांकाने लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता. याबाबत जिल्ह्यातील एका राजकीय संघटनेच्या बड्या नेत्याने मोठी आर्थिक तडजोड घडवून आणून परप्रांतीय तरुणाच्या मृतदेह प्रकरणावर पडदा टाकला का, असा सवाल उपस्थित होत आहे. सदरील घटनेचे ठिकाण राहुरी पोलिस ठाण्यापासुन अवघ्या आठ कि.मी. अंतरावर असतानाही पोलिसांना या घटनेचा मागमुस लागला नाही का? सोशल मिडीयावर मृतदेह सापडल्याचे वृत्त फिरत होते. हि सर्व घटना राहुरी पोलिसांना माहित असताना राहुरी पोलिसांनी मुग का गिळले ?असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.लोणी व राहुरी पोलिसांसह भंगार दुकान मालकाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यासाठी काही संघटनांचे पदाधिकारी वरीष्ठ अधिकार्‍यांची भेट घेवून मागणी करणार आसल्याचे समजते.

त्या भंगारवाल्याचे अनेक गुन्ह्यात नाव, तरीही गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ – राहुरी फॅक्टरीवरील भंगारवाला चोरीच्या गाड्या, विद्युत मोटारी, विविध मशिनरी विकत घेत असल्याने त्याचे अनेक गुन्ह्यात आरोपी नाव घेतात परंतू पोलिस मात्र त्याला कोणत्याही गुन्ह्यात घेत नाही. मध्यंतरी विद्युतपंप चोरीचा तपास पोलिसांनी लावला. यातील खर्‍या गुन्हेगारांनी याच भंगारवाल्याचे नाव घेतले होते. पोलिसांनी मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवला नाही, अथवा तपासासाठी ताब्यात घेतले नाही. उलट या चोरीच्या गुन्ह्यात चांगल्या घरातील मुलांचा संबध नसताना त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर विद्युतपंपाबरोबर मोटारसायकल चोरीचे गुन्हे टाकण्यात आले आहेत. याच भंगारवाल्याने राहुरी पोलिस व तहसिल आवारातील सडलेल्या गाड्याचे भंगार विकत घेतले होते. त्यावेळी लिलावात नसलेल्या गाड्याही या भंगारवाल्याने चोरुन नेल्या तरीही त्यावर तहसिल अथवा पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. तालुक्यातील चोरीचा माल घेत असल्याने हा भंगारवाला नेहमीच चर्चेत असतो. सर्वच ठिकाणी आर्थिक तडजोडी करून प्रकरणांवर पडदा टाकण्यावर तो नेहमीच अग्रेसर असतो.परप्रांतीय कामगाराच्या मृतदेह प्रकरणावरही मोठी आर्थिक तडजोड घडवून पडदा टाकण्याचे काम करण्यात आले आहे.

COMMENTS