निघोज : आडवाटेचे पारनेर, नागेश्वर मित्र मंडळ व स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ. पद्मभूषण अण्णा हजारे महावक्ता करंडक स्पर्धा’ राळेगणसिद्धी येथे पार पडली. या भव्य स्पर्धेला स्वतः डॉ.अण्णा हजारे यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर अशा वेगवेगळ्या गटांमध्ये वक्तृत्वाची चुरस पाहायला मिळाली. इयत्ता चौथी ते सातवी – तालुकास्तर, इयत्ता आठवी ते बारावी – जिल्हास्तर, उच्च माध्यमिक – राज्यस्तर अशा विविध गटांमध्ये स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या मानाच्या स्पर्धेत डी. बी. एम. इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, राळेगणसिद्धी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या लौकिकात भर घातली. इयत्ता सातवीत शिकणारी शिंदे सिद्धी निलेश हिने तालुकास्तरीय गटात प्रभावी वक्तृत्व सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तिला २००० रुपये रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता आठवीतील काव्या सुहास शेळके हिने उत्कृष्ट सादरीकरण करत उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. तिला ५०० रुपये रोख, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल विजेत्या विद्यार्थिनींचे संस्थापक अध्यक्ष जे. डी. मापारी, प्राचार्या शीतल मापारी, उपप्राचार्या अर्चना लटांबळे_पोटघन, विद्या पवळे, शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना अधिक वाव देण्यासाठी अशा स्पर्धा प्रेरणादायी ठरतात, असे मत व्यक्त करण्यात आले. डीबीएम शाळेच्या या यशामुळे परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

COMMENTS