Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातील येळीमध्ये भरदिवसा दरोडा

ग्रामस्थांनी एकाला पकडत दिले पोलिसांच्या ताब्यात

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील येळी गावामध्ये गुरूवारी भरदुपारी दीडच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी भरदिवसा कराड यांच्या बंद घरावर दरोडा टाकत

आरक्षणाचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा गाठ आमच्याशी ः प्रतीक्षा बंडगर
कु. गुंजन अग्रवालचा सत्कार
अखेर संपत सूर्यवंशी यांचा बनावट प्रस्ताव प्रकरणाचा कबुलीजबाब l पहा LokNews24

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील येळी गावामध्ये गुरूवारी भरदुपारी दीडच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी भरदिवसा कराड यांच्या बंद घरावर दरोडा टाकत रोख रक्कम सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला होता. यावेळी त्यातील एका दरोडेखोराला किशोर कराड व तेथील ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले असून बाकी जण फरार झाले आहेत. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यत पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
याबाबत समजलेली प्राथमिक माहिती अशी की, कराड हे येळी गावातील बोंदरवडी रोड वरील खंडोबा वस्ती राहत असून शेजाराच्या लग्नासाठी तेथील सर्व कुटुंबीय गावात गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी कराड यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील ठेवलेले रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्याची चोरी केली.तेवढ्यात कामानिमित्त किशोर दराडे हे आपल्या घरी आले असता कराड यांना पाहताच काही दरोडेखोर पळाले. मात्र त्यातील एक दरोडेखोर पाठीमागे राहिला त्याने घराच्या कंपाउंड वरून उडी टाकून शेतातून पळत असताना किशोर कराड व गावातील काही ग्रामस्थांनी त्या दरोडेखोराचा पाठला करून त्याला पकडले.ही घटना गावात आणि परिसरात वार्‍यासारखी पसरल्याने मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. दरम्यान या दरोडेखोराला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. मात्र अनुचित प्रकार घडू नये, म्हणून गावातील काही लोकांनी या दरोडेखोराला घरात बंद करून ठेवले. या घटनेची पोलिसांना माहिती दिल्यानंतर बराच उशिराने पोलीस गावात दाखल झाल्याने नागरिकांचा रोष पाहायला मिळाला. पोलिसांनी या दरोडेखोराला ताब्यात घेतले आहे.

COMMENTS