Homeताज्या बातम्यामनोरंजन

मालिका सोडल्यानंतर दयाबेन पहिल्यांदाच कॅमेऱ्यात झाली स्पॉट

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दयाबेन परतणार अशी चर्चा होत आहे पण अद्याप मालिकेमध्ये दिशा वाकानीची एन्ट्

अन्यथा, माणसांची यंत्रे बनतील ! 
विना अपघात सतत पंचेवीस वर्षे सेवा करणार्‍या पस्तीस बस चालकांचा सपत्नीक विशेष गौरव समारंभ बीड येथे संपन्न
मनच सर्व गुणांचे उगमस्थान


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये दयाबेन परतणार अशी चर्चा होत आहे पण अद्याप मालिकेमध्ये दिशा वाकानीची एन्ट्री झालेली नाही. नेहमीच चाहते दया भाभी पुन्हा मालिकेमध्ये कधी दिसणार? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. सध्या सर्वत्र नवरात्रीची धुम सुरू आहे. फारशी कॅमेऱ्यासमोर न येणारी दिशा वाकानी नवरात्रीनिमित्त पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली. अभिनेत्री नुकतीच एका गरबा पंडालमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.अभिनयातून ब्रेक घेतलेल्या दिशाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सूक आहेत. दिशा खरंतर फारशी सोशल मीडियावर सक्रिय नसते. नुकतंच दिशाने एका गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी दिशा, तिच्यासोबत पती, मुलांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सध्या त्या कार्यक्रमातले अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी चॅनलने तिच्या काही व्हिडीओ शेअर केल्या आहेत. यावेळी अभिनेत्रीने गोल्डन रंगाचा लेहेंगा, त्यावर गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली आहे. न्यूड मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक पुर्ण केला होता.अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपने दिशा कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाल्यामुळे चाहते फारच आनंदित झाले आहेत. देवीच्या दर्शनावेळी अभिनेत्रीने सर्वांसोबत हसून खेळून गप्पा देखील मारल्या

COMMENTS