Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखच्या आवळल्या मुसक्या

हत्येची दिली कबुली कर्नाटकातून पोलिसांनी केली अटक

मुंबई ः रायगड जिल्ह्यातील उरण येथील 22 वर्षीय यशश्री शिंदे या तरूणीची हत्या करून तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या मुख्य आरोपी दाऊद

शिवाजी महाराजांनी ईडीसारखी सक्तीची वसुली केली
संविधान रत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 
शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

मुंबई ः रायगड जिल्ह्यातील उरण येथील 22 वर्षीय यशश्री शिंदे या तरूणीची हत्या करून तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या मुख्य आरोपी दाऊद शेख याच्या पोलिसांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत. दाऊदनेच यशश्रीच्या हत्येची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याला मंगळवारी मुंबईमध्ये आणले आहे.
प्राथमिक चौकशी केल्यानंतर माहिती देतांना उरण पोलिसांनी सांगितले की, आरोपी दाऊदला मंगळवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. तर मोहसीन नावाचा आणखी एक व्यक्ती यशश्रीच्या संपर्कात होता. तिच्या संपर्कात असलेल्या दोन ते तीन संशयितांची आम्ही चौकशी केली. त्यापैकी दाऊदला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. सध्या या प्रकरणात आणखी कोणी संशयित नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे यशश्री आणि दाऊद यांची आधीपासूनच एकमेकांशी मैत्री होती. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून यशश्री दाउदच्या संपर्कात नव्हती. याच रागातून त्याने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, अजूनही चौकशी पूर्ण झालेली नाही. अद्याप चौकशी सुरू आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार यशश्रीचा चेहरा हा जनावरांनी खराब केला असावा. याबाबत शवविच्छेदन अहवाल आज आमच्या हाती येणार आहे. यावरून सर्व बाबी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले. यामध्ये अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याचे पोलिसांनी खंडन केले आहे. पोलिस म्हणाले, त्या दोघांनी एका ठिकाणी भेटायचे ठरवले. त्यानुसार त्यांची भेट झाली. मात्र या भेटीनंतर वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच ते दोघे एकाच गावात, जवळपास राहत होते असेही पोलिस म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी आता पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. यशश्रीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातून दाऊदला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, यशश्री शिंदे हिच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता. यामध्ये आरोपी दाऊद शेख हा तिचा पाठलाग करत असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS