Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापूसखेडमध्ये कन्येची सशस्त्र सीमा दलात निवड

इस्लामपूर : कापूसखेड येथे सशस्त्र सीमा दलात भरती झालेल्या स्नेहल खराडे हिचा सत्कार करताना ग्रामस्थ. ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण; जल्लोषात स्व

पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील
कराड पालिका अनुकंप प्रतिक्षा यादीतील कर्मचार्‍यांची नियुक्तीची प्रतिक्षा संपली
तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता

ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण; जल्लोषात स्वागत
इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील कापूसखेड गावची कन्या स्नेहल कृष्णा खराडे हिची बिहार येथे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) दलात निवड झाली. राजस्थान येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रथमच गावात आल्यानंतर तीची गावातून मिरवणूक काढत उत्साही स्वागत करण्यात आले. कापूसखेड तसेच परिसरातून पहिली महिला फौजी होण्याचा मान तिने मिळवला. वडील शेतकरी कृष्णा खराडे तर आई संगिता खराडे गृहिणी, घरची परिस्थिती बेताची अशा परिस्थीतही तिने आपले शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आई-वडिलांची मुलीने सैन्यात भरती व्हावे, अशी इच्छा होती. त्याप्रमाणे स्नेहल हिने खडतर परिश्रम घेतले. सैन्य दलात भरती होण्यासाठी गावातील मैदानावर तसेच इस्लामपूर येथे सराव केला. तीन महिन्यापूर्वी राजस्थान येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाली होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती प्रथमच कापूसखेड येथे आली होती. यावेळी ग्रामस्थांनी तिची मिरवणूक काढली. गावात ठिकठिकाणी तीचा सत्कार करण्यात आला.

COMMENTS