Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासर्‍याकडून सुनेचा विनयभंग

सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

बीड प्रतिनिधी - शहरातील मुहम्मदिया कॉलनी भागात राहणारा  शफिक उर्फ मुन्ना पेंटर याने  घरात कोणी नसताना सुनेचा हात धरून वाईट हेतूने छातीस धरले आणि

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान !
शिवथाळीची ऐशी-तैशी..! चक्क शौचालयात धुतली जात आहेत भांडी
पाथर्डी आगारातून सत्तर दिवसांनंतर धावली लालपरी

बीड प्रतिनिधी – शहरातील मुहम्मदिया कॉलनी भागात राहणारा  शफिक उर्फ मुन्ना पेंटर याने  घरात कोणी नसताना सुनेचा हात धरून वाईट हेतूने छातीस धरले आणि सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी  सुन अल्फिया परवेज शेख हिने पेठ बीड पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासर्‍याविरुद्ध तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्फिया परवेज शेख वय 20 वर्ष व्यवसाय- घरकाम रा. मोहमदीया कॉलनी पेठ बीड या विवाहितेने पेठ बीड पोलीस ठाणे पेठ बीड येथे सासरे  शेख शफीक उर्फ मुन्ना पेंटर  याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती परवेज, सासु परवीन, सासरा शफीक उर्फ मुन्ना यासीन, नणंद तरन्नुम असे आम्ही सर्वजण एकत्रच राहतात. माझे लग्न चार महिन्यापुर्वी झालेले आहे. दिनांक 16 जूलै 2023 रोजी दुपारी 02.00 वाजण्याच्या सुमारास मी आणि माझे सासरे असे दोघेच घरी होतो. व माझे पती, सासु नणंद हे कामानिमित्त बाहेर गेलेले होते. याचा फायदा घेवुन माझे सासरे शफीक उर्फ मुन्ना यासीन शेख व्यवसाय पेंटर स. मोहम्मदीया कॉलनी पेठ बीड याने वाईट हेतुने माझ्या डाव्या हातास धरून छातीस धरले व माझ्या रुममध्ये ये असे म्हणाले असता मी घाबरुन घराच्या बाहेर आले. त्यानंतर मी माझे पती आणि सासु घरी येईपर्यंत घरात गेले नाही व घराच्या बाहेर थांबले. अंदाजे 2.45 वाजण्याच्या सुमारास माझी सासु व नवरा परवेज हे बाहेरहून आले तेव्हा मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली असता त्यांनी काहीही खोटे बोलु नकोस तुझीच वागणूक चांगली नाही असे म्हणाले व घडलेला प्रकार कोणालाही सांगितला तर तुला जिवे मारुन टाकू. तुला नांदायचे नाही का अशी धमकी दिली. त्यामुळे भितीपोटी झालेला प्रकार माझे आई वडील किंवा नातेवाईक यांना सांगण्यासाठी माझ्याकडे मोबाईल नसल्यामुळे मी वडीलांना किंवा नातेवाईक यांना सांगु शकले नाही. त्यामुळे मी फिर्याद देण्यास येवु शकले नाही. त्यानंतर आज दि. 29/07/2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजण्याचे सुमारास माझे वडील तय्यब रज्जाक सय्यद भाऊ अयान व माझ्या बहीनीचा सासरा शेख जानी शेख फत्तु व शद्रख हरी काळे असे माझी बहीण उजमा अजीम मकानदार हिच्या मुलाचा नाव ठेवण्याचा कार्यक्रम माहेरी तेरखेडा येथे असल्याने मला ते नेण्यास आले असता त्यांना मी घडलेली हकीकत सांगितली असता त्यांनी माझा नवरा, सासु सासरा, नणंद यांना माझ्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी माझ्या मोठ्या बहीणीचा सासरा शेख जानी शेख फत्तु रा. मोहम्मदीया कॉलनी बीड व वडील तय्यब रज्जाक सय्यद भाऊ नामे अयान रा. तेरखेडा व शद्रख हरी काळे रा. भक्ती कंट्रक्शन बीड यांचे समक्ष पती परवेज व सासु परवीन, सासरा शफीक उर्फ मुन्ना यासीन, नणंद तरन्नुम यांनी संगनमत करून मला व माझे नातेवाईकांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व घराच्या बाहेर हाकलुन दिले. म्हणुन माझी शफीक उर्फ मुन्ना यासीन शेख, परवेज शफीक उर्फ मुन्ना शेख, परवीन शफीक उर्फ मुन्ना शेख, तरन्नुम फारुखी शेख सर्व रा. मोहमदीयाँ कॉलनी पेठ बीड यांचे विरुद्ध तक्रार आहे. असे विवाहितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

COMMENTS