Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैनिकी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दशरथ पवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

बीड प्रतिनिधी - सैनिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी दशरथ विठ्ठल पवार याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शाळेकडून सत्कार समारंभाचे आयोजन कर

नारायण गव्हाण खून खटल्यातील आरोपींची जामीनावर मुक्तता
*सिरम नंतर आता ‘हा’ लस उत्पादक पुण्यात दाखल | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
फायद्यासाठी पक्ष बदलणार्‍या नाईकांना जनता थारा देणार नाही : सम्राट महाडीक

बीड प्रतिनिधी – सैनिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी दशरथ विठ्ठल पवार याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शाळेकडून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सैनिकी शाळेचे प्राचार्य श्री डाके एस ए यांनी दिली.
नवगण शिक्षण संस्था, राजुरी संचलित सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बीड शाळेचा माजी विद्यार्थी दशरथ विठ्ठल शिंदे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. युवानेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दशरथ पवार यास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानिमित्ताने आयोजित सत्कार समारंभात प्राचार्य डाके एस ए, मिलिंद शिवनीकर, प्रा. रवी झोडगे, प्रशांत करपे , डॉ. अविनाश बारगजे, शिवाजी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती दशरथ पवार यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. ग्रामीण भागातील मुलंही कमी नाहीत, प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते असे सांगून आपल्या या यशामध्ये सैनिकी विद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. रवी झोडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य डाके एस ए यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. अविनाश बारगजे यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर
सैनिकी विद्यालय बीड येथे राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉक्टर शेटे मॅडम व त्यांची टीम कडून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना किरकोळ सर्दी, खोकला, ताप आहे अशांना आयसोलेट करून औषधोपचार, गोळ्या देण्यात आल्या. इतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत माहिती देण्यात आली. दरवर्षी वर्षभरातून तीन ते चार वेळेस डॉ. शेटे मॅडम व त्यांची टीम सैनिकी मुलांचे आरोग्याची काळजी घेत असते.

COMMENTS