मुंबई :विधानसभेचे अध्यक्ष नार्वेेकर यांचे अभिनंदन करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नार्वेकर देशातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. अध्यक्
मुंबई :विधानसभेचे अध्यक्ष नार्वेेकर यांचे अभिनंदन करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नार्वेकर देशातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. अध्यक्षांची भूमिका न्यायमूर्तीसारखी असते आणि महाराष्ट्राने हा नवा रेकॉर्ड केला आहे. तुमच्या मतदारसंघात कामासाठी आलो तेव्हा कोणीही तुमच्याबद्दल तक्रार करणारे सापडले नाही. नार्वेकरांनी लोकहिताची अनेक कामे केली, असे म्हणत फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. वरच्या सभागृहातील सभापती आणि खालचे अध्यक्ष यांचे नाते सासरे आणि जावयाचे आहे, याचा उल्लेखही फडणवीस यांनी केला. पुढे फडणवीस म्हणाले, पु.ल. देशपांडे म्हणतात की जावई सासर्याचे एकमत होणे कठीण असते. ते जावयाचा उल्लेख असा करतात की जावई सासर्याच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे. पण नार्वेकरांचे आपल्या सासर्यांवर खूप प्रेम असल्याचा टोला देखील नार्वेकरांनी लगावला.
COMMENTS