Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिघोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दशरथ राजगुरू

जामखेड ः जामखेड तालुक्यातील दिघोळ ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या दिघोळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दशरथ कचरू राजगुरू यांची बिनविर

मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू
BREAKING: देवेंद्र फडणवीसवर गुन्हा दाखल | LokNews24
पुणतांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोणाची होणार निवड ?

जामखेड ः जामखेड तालुक्यातील दिघोळ ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या दिघोळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दशरथ कचरू राजगुरू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ठरलेल्या मुदतीनंतर उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी दशरथ कचरू राजगुरू व अशोक आजिनाथ गीते यांनी अर्ज दाखल केले. यावेळी चिठ्ठ्या टाकून झालेल्या मतदानात दशरथ राजगुरू यांना सहा मते तर अशोक गीते यांना पाच मते पडली त्यामुळे दशरथ राजगुरू यांची उपसरपंच पदी एकमताने निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. तांबोळी यांनी घोषित केले. यावेळी पोलिस पाटील राजेंद्र गीते यांनी निवडणूक कामात सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच रंजना पिराजी दगडे, माजी सरपंच रेखा अर्जुन गीते, माजी उपसरपंच पवन डावकर, सदस्य सविता संतोष शिंदे, बळीराम बाबासाहेब तागड, भीमराव विधाते, राणी आवारे, कौताबाई गीते, यमुनाबाई रंधवे हे सदस्य उपस्थित होते. या निवडणुकीत सरपंच पिराजी विठ्ठल दगडे, भाजप नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू, माजी सरपंच नानासाहेब गीते, संतोष शिंदे, पवन डावकर, सुरज रसाळ, संतोष माने, तंटामुक्ती अध्यक्ष पैलवान धीरज रसाळ, तय्यबभाई शेख, वसंत रसाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उपसरपंचपदी दशरथ राजगुरू यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले तसेच परळी विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समिती अध्यक्ष वाल्मिक कराड, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद कारले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, वैजनाथ पाटील, गौतम उतेकर, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, केशव वनवे, संजय गोपाळघरे, सरपंच महारुद्र महानवर, नानासाहेब गोपाळघरे, सुभाष जायभाय, संदीप जायभाय यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS