Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन ठिकाणी धाडसी चोर्‍या

18 टन कापूस नेला वाहून

अहमदनगर प्रतिनिधी - राहुरी व राहाता तालुक्यातील दोन ठिकाणी शेतातील कापसाच्या धाडसी चोर्‍या केल्या गेल्या. या दोन्ही ठिकाणी मिळून तब्बल 18 टन काप

झाड तोडताना मध्ये आल्याच्या रागातून दोन  महिलांना कोयत्याने मारून धमकी  
भिंगारच्या ’त्या’ घटनेबद्दल नोंदवले 40 जबाब ; येत्या दोन-तीन दिवसात अहवाल अपेक्षित, पोलिस व नागरिकांचे लक्ष
ज्योतिषी वामन रंगनाथ महाजन यांचा सन्मान

अहमदनगर प्रतिनिधी – राहुरी व राहाता तालुक्यातील दोन ठिकाणी शेतातील कापसाच्या धाडसी चोर्‍या केल्या गेल्या. या दोन्ही ठिकाणी मिळून तब्बल 18 टन कापूस वाहनांतून वाहून नेला गेला. या प्रकरणी राहुरी व राहाता पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


राहुरी तालुक्यातील महालगाव शिवारातील शेतातील स्टोअररूमच्या दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून कोणीतरी आतील 50 हजार रुपये किमतीचा दहा क्विंटल कापूस चोरून नेला. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी दत्तात्रय गोविंद कदम (वय 45, राहणार तनपुरेवाडी, राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. गाळ्याच्या छताच्या लोखंडी पत्र्याचे हुकचे नट खोलून व पत्रा बाजूला करुन कोणीतरी आतील 64 हजार रुपये किमतीचा आठ क्विंटल कापूस चोरुन नेला. ही घटना राहाता तालुक्यातील पुणतांबा आशा केंद्राजवळील गाळ्यात घडली. या प्रकरणी राहता पोलिसांनी विष्णू भाऊसाहेब डोके (राहणार डोहगाव वैजापूर, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.

COMMENTS