Homeताज्या बातम्यादेश

दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग

अनेक डबे जळून खाक जीवितहानी नाही

नवी दिल्लीः दरभंगा एक्सप्रेसच्या तीन बोगींनी लागलेल्या आगीत बोगी जळून खाक झाल्या आहेत. लोकांनी उड्या मारून आपला जीव वाचवल्यामुळे सुदैवाने जीवितहा

ज्याचा त्याचा प्रश्न
आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते २७८० आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप
गाझापट्टीत भयावह दृश्ये

नवी दिल्लीः दरभंगा एक्सप्रेसच्या तीन बोगींनी लागलेल्या आगीत बोगी जळून खाक झाल्या आहेत. लोकांनी उड्या मारून आपला जीव वाचवल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे. नवी दिल्लीहून दरभंगाकडे जाणार्‍या एक्सप्रेस रेल्वेला इटावाजवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली.
शयनयान बोगीला ही आग लागली. ज्या बोगीला आग लागली त्यामध्ये क्षमतेच्या दुप्पट प्रवासी प्रवास करत होते.आग लागताच प्रवाशांनी खिडकीतून बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला. दरम्यान या अपघातात जिवीतहानीचे वृत्त नाही. रेल्वेतून उड्या मारल्याने सहा प्रवासी जखमी झाले आहेत. आगीमुळे अनेक बोगी जळून खाक झाल्या आहेत. काही प्रवाशांचे बोगीतील सामानही जळून खाक झाले आहे. ही दुर्घटना इटावाजवळील सराय भूपत रेल्वे स्टेशनजवळ झाला. हावडा-दिल्ली रेल्वे मार्गावर ओएचई बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वे सेवा सध्या ठप्प आहे. मार्गावरील 16 ट्रेन थांबवण्यात आल्या आहेत. आगीच्या कारणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

COMMENTS