घराणेशाही लोकशाहीसाठी घातक : पंतप्रधान मोदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घराणेशाही लोकशाहीसाठी घातक : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर हल्ला चढववत वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे र

भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरावरील हल्ल्यात पोलिस हुतात्मा
वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढणार – आ. आशुतोष काळे
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई l LokNews24

नवी दिल्ली – संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर हल्ला चढववत वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत तसेच ज्या राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीचे तत्व नाही, ते लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकतील? असा सवालही मोदींनी उपस्थित केला. संविधान दिनानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
काही राजकीय पक्ष हे काही कुटुंबांकडून काही कुटुंबांसाठी चालवले जातात. हे पक्ष लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहेत. घराणेशाही असलेले पक्ष म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक लोक पक्षात येऊ नये असे नाही, तर एखादा पक्ष अनेक वर्षे एका कुटुंबाकडून चालवला जाणे हे लोकशाहीसाठी संकट आहे. आपले संविधान भ्रष्टाचाराला परवानगी देत नाही. न्यायालयाने एखाद्याला भ्रष्टाचाराची शिक्षा दिली असेल आणि त्यानंतरही राजकीय फायद्यासाठी त्यांचे गुणगान होत असेल तर देशातील तरुणांच्या मनात भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालण्याला मान्यता मिळते, असे मोदी यावेळी म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुरुवात झाल्यानंतर आपण 26 नोव्हेंबर या संविधान दिनाची परंपरा सुरु करायला हवी होती. आपल्याला संविधान काय देते, कुठे नेते याची दरवर्षी चर्चा झाली तर संविधान ज्याला जगात एक सामाजिक दस्ताऐवज मानला गेला. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी भेट दिली याची आपण दरवर्षी आठवण म्हणून हा दिन आता साजरा करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी विरोधावर निशाणा साधला. विरोध सुरुवातीपासूनच होतोय. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आणि तुमच्या मनात तयार होत असलेला भाव ऐकण्यासाठी ते तयार नाही. मन मोठं करून बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं त्याचं स्मरण न करणे हे चिंताजनक असल्याचं मोदी म्हणाले. भारत ही लोकशाहीची परंपरा आहे. राजकारणाचे एक महत्त्व आहे. राजकीय पक्ष त्यांचे लोकशाही मूल्य गमावत असतील तर ते लोकशाही कसे जपू शकतात असा सवालसुद्धा मोदींनी विचारला. भ्रष्टाचारावरूनही मोदींनी काँग्रेसवर टीका केली. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा मिळवून देण्याची जी स्पर्धा चालली आहे त्यामुळे नव्याने येणार्‍या लोकांना चुकीचा आदर्श घालून दिला जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. इंग्रज भारताचे अधिकार नाकारत होते. महात्मा गांधींनी अधिकारांसाठी लढताना देशात कर्तव्यासाठी नागरिकांना तयार केले होते. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींनी कर्त्यव्याची बीजे रोवली त्यादिशेने दुर्दैवाने तत्कालीन सरकारने काम केले नसल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली.

संविधानातील मूल्य जपणे ही आपली जबाबदारी
भारतीय संविधान हजारो वर्षांच्या महान परंपरेची आधुनिक अभिव्यक्ती आहे. त्यामुळे संविधानातील मूल्ये जपणे ही आपली जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जेव्हा आपण या संविधानिक व्यवस्थेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी सांभाळतो त्यासाठी नेहमीच स्वत:ला सिद्ध ठेवावं लागेल. हे करताना संविधानाच्या मूल्यांना ठेच लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपण जे काही करतोय ते संविधानानुसार योग्य की चुकीचे हे बघायला हवं. आपल्याला स्वत:चं मूल्यांकन करायला हवे असेही पंतप्रधानांनी सांगितले.

COMMENTS