Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यात सुपर मार्केटमधील वाईन विक्री विरोध व्यसन मुक्त युवक संघाचे दंडवत-दंडुका आंदोलन

हभप बंडातात्या कराडकर यांच्याकडून राजकारण्यांसह मुलांविरोधात व्यसनाधिनतेबाबत वक्तव्यसातारा / प्रतिनिधी : सातार्‍यात बंडातात्या कराडकर यांच्या व्य

सांगवड पुलाजवळ भीषण अपघात; 3 ठार, 2 गंभीर
सातारा जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी
सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून

हभप बंडातात्या कराडकर यांच्याकडून राजकारण्यांसह मुलांविरोधात व्यसनाधिनतेबाबत वक्तव्य
सातारा / प्रतिनिधी : सातार्‍यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी बंडातात्या कर्‍हाडकर यांनी राजकारण्यांसह राजकारण्यांच्या मुलांच्या व्यसनाधिनतेवर प्रहार चढवला. तर खा. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन रस्त्यावर नाचतानाचे फोटो देखील आहेत. फोटो शोधले तर नक्कीच सापडतील, असा त्यांनी आरोप केला. याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ढवळा असून उपमुख्यमंत्री अजित पवार पोवळा असल्याची टीकाही त्यांनी केली.
हभप बंडातात्या कर्‍हाडकर म्हणाले, राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडतात. याचे पुरावे देखील आहेत. खा. सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे दारू पिऊन रस्त्यावर नाचतानाचे फोटो देखील आहेत. फोटो शोधले तर आपणास नक्कीच सापडतील, असा आरोप करत माजी दिवंगत मंत्री पतंगराव कदम यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला हे शोधा म्हणजे उत्तर मिळेल, असेही सुनावले. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ढवळा असून अजित पवार पोवळा असल्याची सडकून टीका यावेळी बंडातात्यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा. यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्यावतीने सातार्‍यात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी दंडवत दंडुका आंदोलनाला पोलिसानी मज्जाव केल्याने वारकरी आणि पोलिसांच्यात काहीकाळ शाब्दिक चकमक उडाली. यादरम्यान वारकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमलेल्या वारकर्‍यांनी पोलिसांच्या दंडेलशाहीचा निषेध करत रस्त्यावर दंडवत घालत प्रशासनाचा निषेध केला.
सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला असून हा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी तो तातडीने मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी व्यसनमुक्त युवक संघ यांच्यावतीने आणि बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे हातात लाकडी दांडू घेऊन दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. तसेच या सरकारने ऐकलं तर ठिक अन्यथा हातात घेतलेला दंडुका सरकारला शुध्दीवर आणण्यासाठी दाखवण्यात येईल, असा इशाराही यावेळी कार्याध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी दिला आहे.

COMMENTS