Homeताज्या बातम्यासंपादकीय

डान्स विरूद्ध नो व्हॅकन्सी !

      बिहार निवडणूक आता अगदी टोकाच्या आणि आक्रमक भाषाघाईवर आलेली आहे. काल, आपण पाहिलं असेल की, तेजस्वी यादव यांनी थेट अमित शहा यांना आव्हान केलं,

चौदाशे आकडेबहाद्दरांना महावितरणचा दणका
गॅस टाकी भरताना ओटीपी आवश्यक ः विशाल जगताप
बाई गं’ चित्रपट १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस


      बिहार निवडणूक आता अगदी टोकाच्या आणि आक्रमक भाषाघाईवर आलेली आहे. काल, आपण पाहिलं असेल की, तेजस्वी यादव यांनी थेट अमित शहा यांना आव्हान केलं, तर, आज राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत मतदानासाठी ते डान्स करायलाही तयार राहतील, त्यांना केवळ तुमच्या मतांशी घेणं आहे; दुसरं काहीही नाही! निवडणुकीच्या आधी ते दिसतात, पण, निवडणूक झाल्यानंतर मात्र ते गायब होतात; अशा प्रकारची टीका केली. तर, त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील जाहीरपणे टीका करताना, बिहारच्या सीएम आणि देशाच्या पीएम पदासाठी सध्या जागा रिकामी नाही; त्यामुळे, लालूप्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांनी यावर आता नजर ठेवून निवडणुका करू नये, अशा प्रकारे वक्तव्य केलंय. या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, बिहारच्या निवडणुका या केवळ वरवरच्या टीकाटिप्पणी करणाऱ्या निवडणुका नसून, या देशाच्या सामाजिक राजकारणाला आकार देणाऱ्या निवडणुका बनल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे काही बोललं जात आहे, ते अतिशय टोकाचं आणि धारदार बोललं जात आहे. अर्थात, तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकीच्या प्रचाराची पूर्ण धुरा त्यांच्या स्वतःवर घेतलेली आहे. राहुल गांधी यांचीही त्यांना मोठ्या रॅलीमध्ये मदत होते; तर, दुसऱ्या बाजूला बिहार निवडणुका या पूर्णपणे अमित शहा यांच्या मुत्सद्दीपणावर आणि नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर भारतीय जनता पक्षाकडून लढवल्या जात आहेत. बिहारच्या निवडणुका लढताना आम्ही सत्तेत आलो तर करप्शन, क्राईम आणि कम्युनिलिअझम या मुद्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही; असं थेट आव्हान तेजस्वी यादव यांनी केलेलं आहे. शिवाय महागठबंधनला केवळ सरकार बनवायचं नाही; तर, बिहार बनवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. नितीश कुमार यांनी वीस वर्षे मुख्यमंत्री राहून आणि नरेंद्र मोदी गेली अकरा वर्ष पंतप्रधान राहून ही बिहारमध्ये एकही कारखाना त्यांनी उघडला नाही. याउलट बिहारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला, असं वक्तव्य करून भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि जातिवाद या बाबींशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या निवडणुका थेट आव्हानात्मक आहेत. तर, दुसऱ्या बाजूला नितीश कुमार यांचा चेहरा भारतीय जनता पक्ष वापरत असला तरी, खरी राजकीय प्रचाराची धुरा मात्र, अमित शहा यांनी सांभाळलेली आहे. बिहारच्या निवडणुका या पूर्णपणे सामाजिक समीकरणावर आधारलेल्या असून आणि राजकीय दृष्ट्या त्या सामाजिक तळातील लोकांना नेमकं काय हवं आहे, याची चाणाक्ष पद्धतीनं मांडणी तेजस्वी यादव यांनी प्रचार सभांमधून सुरू केले आहे. अर्थात, महागठबंधनचा जो जाहीरनामा आहे त्यावर आम्ही कालपरवा लिहिलंच होतं; हा जाहीरनामा १९९१ पूर्वीच्या भारतीय राजकारणाची एक प्रकारे आठवण करून देणारा आहे. समाजवादी आणि समाजाच्या कल्याणाची अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने सगळ्या योजना याची मांडणी करणारा जाहीरनामा महागठबंधनने देऊन आगामी काळात भारतीय निवडणुकांची एक व्यापक पार्श्वभूमी  तयार केली. आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आश्वासन दिले जात होती. परंतु, बिहारच्या निवडणुकांमध्ये केवळ आश्वासन नव्हे तर सामाजिक उत्थान आणि सामाजिक कल्याणाच्या योजना देत असतानाच त्या प्रत्येक जात समूहामध्ये गेल्या पाहिजे; याची काळजी यामध्ये घेतली जात आहे. परंतु, आजच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असं की, एका बाजूला अमित शहा यांनी वक्तव्य करताना जाहीरपणे हे म्हटलं की, बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने लालूप्रसाद यादव त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्याची स्वप्न पाहत असले आणि सोनिया गांधी या त्यांच्या मुलाला पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न पाहत असले तरी, देशामध्ये या जागा सध्या रिक्त नाहीत; असं त्यांनी वक्तव्य केलं! मात्र, यावर उत्तर न देता राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत ते छटपूजेला बाहेरून पाणी आणून करित आहेत. या छटपूजेशी त्यांना काहीही घेणे देणे नसून, त्यांना केवळ बिहारी जनतेची मते हवी आहेत. या मतांसाठी ते प्रत्यक्षात डान्स करायलाही तयार होतील; असं थेट वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्यामुळे, ही निवडणूक किती टोकाची चुरशीची आणि तितकीच निर्णयाक बनली आहे, ही बाब मात्र स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.

COMMENTS