Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात अवकाळीने 87 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुणे : राज्यात गेल्या दोन आठवडयांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 87378.72 हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जि

स्वच्छता अभियानांतर्गत आंब्रळ टेबललँड पठारावर स्वच्छता मोहीम
कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे : कृषीमंत्री दादाजी भुसे
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार

पुणे : राज्यात गेल्या दोन आठवडयांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 87378.72 हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती नुकसान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, 7 ते 20 एप्रिल या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 37,981.79 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्षे, भाजीपाल्याचा समावेश आहे. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यात 16091 हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात मका, कांदा, वाटाणा, किलगड, आंबा, झेंडू, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, डाळिंब पिकांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात 8765 (पान 4 वर) (पान 1 वरून) हेक्टरवर नुकसान झाले असून, त्यात लिंबू, भुईमूग, कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6243 हेक्टरवरील बाजरी, गहू, कांदा, आंबा, सूर्यफूल, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

COMMENTS