Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दलित पँथरने दिला डॉ. सुजय विखे यांना जाहीर पाठिंबा

अहमदनगर ः महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पँथर संघटनेने जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्य

निघोज कृषी फलोद्यान संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लामखडे
देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी
मोठी बातमी ! पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

अहमदनगर ः महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पँथर संघटनेने जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्याचबरोबर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सक्रीय झाले असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरच्या दक्षिण मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यांना विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्याता दलित पँथरने पाठिंबा जाहिर केल्याने त्यांचे निवडणुकीतील बळ वाढले असून त्यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरच्या रुपाने राज्यात आंबेडकरी विचारांची चळवळ उभी केली. यामुळे फुले शाहू आणि आंबेडकर यांचे विचार पुढे घेवून जाणार्‍या महायुती सरकार नक्की प्रयत्न करेल असा आमचा विश्‍वास आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी दलित पँथर सर्वोतपरी प्रयत्न केले जाणार आहेत. असे दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले. दलित पँथरच्या या भुमिकेमुळे महायुतीच्या उमेदवारांना त्याचा मोठा फायदा होईल अशा विश्‍वास सुद्धा सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.  

COMMENTS