Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुध उत्पादक शेतकर्‍यांनी नफ्या तोट्याचा विचार करून व्यवसाय करावा : डॉ. प्रशांत पाटील

काळुंद्रे : शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना बीव्हीजीचे संचालक डॉ. प्रशांत पाटील व उपस्थित शेतकरी. शिराळा / प्रतिनिधी : शेती व्यवसायामध्ये अनेक समस्

सांगली मार्केट कमिटीत हळदीला मिळाला प्रती क्विंटल 11500 दर
येवला बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार समितीत मका खरेदीस सुरुवात (Video)
तुर, हरभरा पिकांवर थंडीचा परिणाम ; शेतकरी अडचणीत 

शिराळा / प्रतिनिधी : शेती व्यवसायामध्ये अनेक समस्या आहेत, शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. मात्र, हा व्यवसाय करताना शेतकर्‍यांनी नफ्या तोट्याचा विचार करावा, असे मत बीव्हीजी अ‍ॅग्रो. प्रा. लि. ग्रुपचे संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले. काळेश्‍वर मंदिर, काळुंद्रे, ता. शिराळा येथे डीलर अंबामाता कृषी सेवा केंद्र, कोकरूड मार्फत दुग्ध व्यवसायातील समस्या व प्रभावी उपाय योजना संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच दिलीप पाटील होते. प्रारंभी स्वागत पशुधन पर्यवेक्षक गोरख मोहिते यांनी केले.
डॉ. पाटील म्हणाले, शेती व दूध व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीचा व खर्चिक होत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर बीव्हीजी ग्रुपची उत्पादने त्यामध्ये असणार्‍या पौष्टिक घटकांमुळे अत्यंत प्रभावी व कमी खर्चात चांगला भरघोस नफा मिळवून देणारी ठरली आहेत. दूध उत्पादन देणार्‍या जनावरांच्या समस्या म्हणजे जनावरे पान्हवणे, माजावर येणे, वेळेत गर्भधारणा होणे आदीसाठी बीव्हीजीची उत्पादने प्रभावी ठरली आहेत. शेतकर्‍यांनी जास्तीत-जास्त दुग्ध उत्पादनासाठी आपल्या जनावरांना बीव्हीजी धारा, रज्जो व वरदान सारखी उत्पादने दूध वाढीसाठी त्यांचा नियमित वापर करावा. यावेळी अजय जाधव, अनिकेत पाटील, श्रीधर पाटील, वसंत पाटील, बंडा फौजी व ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बीव्हीजीचे शिराळा तालुका डीलर दिग्विजय पाटील यांनी मानले.

COMMENTS