Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईराज प्रतिष्ठानची दहीहंडी उत्साहात

राहुरी /प्रतिनिधी ः  डिजेवर वाजणारी एकाहून एक सरस हिंदी व मराठी गीते व त्यावर थिरकणारी शेकडो तरुणाईची पावले अन् हलगी व लेझीमचा गजर अश्या उत्साहात

अकरा गावेही विकासाच्या रडारवर – आ. आशुतोष काळे 
30 कोटी किमतीच्या साकुर पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ
पारनेरला वराळ पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उपोषण

राहुरी /प्रतिनिधी ः  डिजेवर वाजणारी एकाहून एक सरस हिंदी व मराठी गीते व त्यावर थिरकणारी शेकडो तरुणाईची पावले अन् हलगी व लेझीमचा गजर अश्या उत्साहात राहुरी फॅक्टरी येथील साईराज प्रतिष्ठानची दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी तरूणाईचा उत्साह हा बघण्यासारखा होता.

  साईराज प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही राहुरी कारखाना मंगल कार्यालयाच्या प्रांगणात गोकुळ अष्टमीनिमित्त दहिहंडी उत्सव संपन्न झाला. राहुरी येथील मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळाला.गोविंदा पथकाचे नेतृत्व नरेंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमास माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, आकाश बेग,शिवसेनेचे सचिन म्हसे,युवासेना तालुकाप्रमुख रोहन भुजाडी, ओंकार खेवरे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय गव्हाणे,पै. संदीप लांडे,भाजपचे वसंत कदम,माजी नगरसेवक अमोल कदम, प्रशांत कोठुळे, भारत शेटे,सतीश संसारे,किशोर गडाख,बाळासाहेब आढाव, बाळासाहेब लोखंडे,मनोज भोंगळ, ऋषभ लोढा,कुलदीप पवार, सुमेध सोज्वळ,ज्ञानेश्‍वर मोरे,प्रमोद कोळसे,शंतनू नालकर,दिपक पंडित,गणेश उंडे,योगेश उंडे,अभि गवळी, ईश्‍वर डफळ, आदित्य गवळी,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले. दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. दहीहंडी उत्सवासाठी जिल्हा बँक, डॉ.तनपुरे साखर कारखाना प्रशासकीय मंडळ, राहुरी पोलिस स्टेशन अधिकारी व कर्मचारी, व राहुरी कारखाना व परिसरातील सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईराज प्रतिष्ठानचे आकाश जाधव, योगेश राऊत,ऋषि राऊत,कृष्णा शिवले,शुभम जाधव,प्रतीक जाधव,अनूप राऊत,प्रितेश तनपुरे,डॉ.योगेश पगारे, गणेश डावखर,सागर भालेराव,नकुल लगड,शनी आढाव,प्रसाद शिवले,प्रणय भोसले, प्रसाद जाधव,सत्यम थीगळे आदी प्रयत्नशील होते.

COMMENTS