Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमानला दादासाहेब फाळके पुरस्कार

मुंबई/प्रतिनिधी : आपल्या कसदार अभिनयाने आणि सुंदर अदाकारीने अवघ्या रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार्‍या अभिनेत्री वहीदा रहमान यांना यंदाचा ‘दादा

एमएस धोनी बनला पोलिस अधिकारी ?
Honda बाइकचं न्यू एडीशन लाँच
Solapur : भारत बंद ला करमाळा कॉंग्रेस पक्षाचा पाठींबा (Video)

मुंबई/प्रतिनिधी : आपल्या कसदार अभिनयाने आणि सुंदर अदाकारीने अवघ्या रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार्‍या अभिनेत्री वहीदा रहमान यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. मनोरंजन विश्‍वातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ची गणना होते. या वर्षी हा सन्मान अभिनेत्री वहीदा रहमान यांना मिळणार आहे.
वहीदा रहमान यांनी बॉलिवूड विश्‍वात अनेक दमदार चित्रपट केले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर नुकतीच 53 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा यांनी केली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. गतवर्षी हा पुरस्कार अभिनेत्री आशा पारेख यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी ‘दादासाहेब फाळके लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ वहीदा रहमान यांना देण्यात येणार आहे. याची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ’वहिदा रहमानजी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो आहे. वहिदाजी यांचे हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी कौतुक केले आहे. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘गाइड’, ‘खामोशी’ आणि इतर अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. 5 दशकांहून मोठ्या कारकिर्दीत त्यांनी सगळीच पात्रे अतिशय सुंदरपणे साकारली आहेत.

COMMENTS