Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादा पाटील महाविद्यालयात गुणवंत कलाकारांचा सन्मान 

कर्जत प्रतिनिधी - कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या गुणवंत कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

चोरीची मोपेड विकणारा अटकेत  
शेवगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जीवनाचे शिल्पकार बना ः राजयोगिनी सरला दीदी

कर्जत प्रतिनिधी – कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या गुणवंत कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. काळाआड चाललेल्या महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीला उजाळा देण्यासाठी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘शिवजन्म ते शिवराज्याभिषेक’ या नाट्य महाप्रयोगातील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपप्राचार्य व मराठी विषयाचे गाढे अभ्यासक प्रा.भास्कर मोरे तर अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आणि दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे होते. या कार्यक्रमात सर्व कलाकारांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 प्रा. भास्कर मोरे यांनी  मनोगतातून महाविद्यालयाची सर्वंकष प्रगती, सांस्कृतिक वारसा,विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी,सांस्कृतिक मूल्य आदी घटकांवर विवेचन केले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी कला मानवी जीवनाला समृद्ध बनवते.कलाकाराने स्पंज सारखे लवचिक असावे हे सांगत कलाक्षेत्रातील आर्थिक संधीं व महाविद्यालय भविष्यकाळात कलाकारांसाठी  राबवणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्वप्नील म्हस्के यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ प्रमोद परदेशी यांनी मानले. यावेळी ऋतुजा घालमे,वैष्णवी घोडके, प्रकाश शिंदे, सिद्धेश्वर गोरे,आदित्य खामगळ,प्रीती शिंदे आदी विद्यार्थी कलाकारांनी आपली उत्स्फूर्त मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. स्वप्नील म्हस्के, डॉ सुवर्णा गायकवाड, राम काळे, मुन्ना शेख ,सांस्कृतिक विभागातील सदस्य व कलाकार विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS