Homeमहाराष्ट्रशहरं

दि. बा. पाटील यांची साहित्य अकादमीच्या चर्चा सत्र अध्यक्षपदी निवड

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : भारत सरकार साहित्य अकादमी आयोजित सिकंदराबाद येथे 30 डिसेंबर अखेर आयोजित भारत कला महोत्सव अंतर्गत होणार्‍या पश्‍चिम राज्

इस्लामपूरातील पंक्या मुळीक गँगच्या पाचजणांविरोधात; मोक्का अंतर्गत कारवाई : कृष्णात पिंगळे यांची माहिती
तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी
महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : भारत सरकार साहित्य अकादमी आयोजित सिकंदराबाद येथे 30 डिसेंबर अखेर आयोजित भारत कला महोत्सव अंतर्गत होणार्‍या पश्‍चिम राज्यातील नाटके या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांची निवड झाली आहे.
आजवर पाटील यांनी अनेक ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले आहे. विविध परिसंवादात आणि साहित्यावरील चर्चासत्रात त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादातही त्यांनी आपले विचार मांडले आहेत. पाटील यांनी आजवर 17 कथा कादंबर्‍या लिहिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील मराठी साहित्य चळवळीसाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.
सध्या ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्याध्यक्ष आहेत. वाळवा-शिराळा कवी लेखक संघटनेचे संस्थापक आहेत. कामेश्‍वरी साहित्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनी कामेरी सारख्या गावात साहित्याचा जागर अखंड चालू ठेवला आहे. त्यांचे साहित्यातील काम व साहित्यसाठीचे योगदान लक्षात घेऊनच साहित्य अकादमीने त्यांची चर्चा सत्राच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्याबद्दल मराठी साहित्य क्षेत्रातून त्यांच विशेष अभिनंदन होत आहे.

COMMENTS