Innova Crysta खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.

Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

Innova Crysta खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.

इनोव्हा क्रिस्टाच्या पेट्रोल मॉडेलसाठी ऑर्डर घेणं सुरू ठेवलं आहे.

टोयोटा कंपनी भारतीय वाहन बाजारात जबरदस्त कामगिरी करत आहे. कंपनीच्या मर्यादित पोर्टफोलिओला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. फॉर्च्यूनर आणि इन

शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 482 अंकानी घसरला तर निफ्टी 17,674 वर बंद
सिम कार्ड विकणाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक
टू-व्हीलर ब्रँड लॅम्ब्रेटा 2023 मध्ये भारतात पुनरागमन करणार आहे.

टोयोटा कंपनी भारतीय वाहन बाजारात जबरदस्त कामगिरी करत आहे. कंपनीच्या मर्यादित पोर्टफोलिओला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. फॉर्च्यूनर आणि इनोव्हा कारला मोठी मागणी आहे. दरम्यान, कंपनीच्या डीलरशिपने टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल व्हेरिएंटचे बुकिंग तात्पुरते बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. यामागे डिझेल व्हेरिएंटवरील मोठा वेटिंग पीरियड असल्याचं सांगितलं जात आहे. टीकेएमने म्हटलं आहे की, “टोयोटा इनोव्हा २००५ मध्ये भारतात लॉन्च झाल्यापासून खूप मोठी कार बनली आहे. ही कार तिच्या सेगमेंटमधील इतर स्पर्धकांपेक्षा नेहमीच उत्तम राहिली आहे. भारतातील ग्राहकांच्या सतत बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी इनोव्हाने गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक बदल केले आहेत. वेळोवेळी आपल्या कार अपडेट केल्या आहेत. मग ती लक्झरी कार असो अथवा एखादी एमपीव्ही असो. ही कार तिच्या सेगमेंटमधली लीडर राहिली आहे. असं कंपनीने म्हटलं आहे. भारतात जवळपास १० लाख लोकांकडे ही कार आहे. ही कार वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रातील ग्राहकांना परवडते आणि आवडते.

पेट्रोल मॉडेलसाठी बुकिंग्स सुरू– कंपनीने याबाबत सांगितलं की, ज्या ग्राहकांनी आमच्या डीलर्सकडे आधीच बुकिंग केलं आहे त्यांना आम्ही हे वाहन पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय, आम्ही इनोव्हा क्रिस्टाच्या पेट्रोल मॉडेलसाठी ऑर्डर घेणं सुरू ठेवलं आहे.

COMMENTS