कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत पोलिसांनी अळसुंदे परिसरात गांजाची शेती करणार्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सव्वाचार लाख रुपयांचा गांजा जप
कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत पोलिसांनी अळसुंदे परिसरात गांजाची शेती करणार्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सव्वाचार लाख रुपयांचा गांजा जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत अळसुंदे ते कोर्टी रस्त्याच्या बाजुस एकाने त्याच्या शेतात गांजा पिकाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला. या कारवाईमध्ये 4 लाख 29 हजार 820 रुपये किमतीचा सुमारे 21 किलो वजनाचा ओलसर झाडे हिरव्या रंगाचा गांजा जप्त केला. बाळू मारुती गार्डी, वय 45 वर्षे, रा. अळसुंदे, ता. कर्जत याने त्याच्या गट नंबर 330 मधील शेतात मिरचीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनशाम बळप, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोर्हाडे, मंगेश नागरगोजे व पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. महसूल व कृषी विभागाचे कर्मचारीही या कारवाईत सहभागी होते.
COMMENTS