Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फोनवर मोठ्याने बोलल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये राडा

या घटनेत दोघांवर जिवघेणा हल्ला झाला

 नवी मुंबई प्रतिनिधी -  नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. नवी मुंबईच्या कोपर खैरणेमधील हॉटेलमध्ये एका टेबलवर

भारतीय स्टेट बँकेला एक कोटीं रुपयांचा दंड
घरफोडीचे दीड शतक ठोकणारा अखेर आऊट
भाषा-संस्कृतीचे महत्व पालकांमध्ये रुजणे गरजेचे : प्रा. वैजनाथ महाजन

 नवी मुंबई प्रतिनिधी –  नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. नवी मुंबईच्या कोपर खैरणेमधील हॉटेलमध्ये एका टेबलवर दोन व्यक्ती तर बाजूच्या टेबलवर 12 जण जेवण करण्यासाठी बसले होते. त्यातील 12 जणांच्या टोळीमधील एकाला फोन आला, त्यावेळी त्यांनी मोठ्याने बोलणे आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी बाजूला बसलेल्या दोघांनी मोठ्याने आणि शिवीगाळ करण्यावर आक्षेप घेत, त्यांना हटकले. त्यावर त्यांनी हरकत घेत, सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली, त्यावरून वाद इतका टोकाला गेला. बारा जणांनी दोघांवर हल्ला केला.

COMMENTS