मुंबई / प्रतिनिधी : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणीला वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून पाच दिवस सुनावणी होणा
मुंबई / प्रतिनिधी : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणीला वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून पाच दिवस सुनावणी होणार आहे. आजच्या पहिल्या दिवसाची सुनावणी संपली असून आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी झाली.
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ही उलट तपासणी घेतली. तसेच ठाकरे गटाची कागदपत्रे ही खोटी असल्याचा दावाही त्यांनी केला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाची कागदपत्रे तपासल्यानंतर ती बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. जेटमलानी म्हणाले, ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केलेली सर्व बनावट कागदपत्रे आहेत.
तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची जी कागदपत्रे दिली आहेत, ज्यात त्यांनी शिंदेंच्या आमदारांनी सह्या केल्याचा दावा केला आहे. तो देखील खोटा असल्याचे जेठमलानी यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रातील ठरावाची प्रत कुठे आहे? असा सवाल जेठमलानी यांनी सुनावणी दरम्यान केला. तसेच बोगस अपात्रता याचिकेसाठी असा ठराव झाला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे आ. दिलीप लांडे यांची ठरावावरची सही वेगळी असल्याचा दावाही जेठमलानी यांनी केला.
COMMENTS