ममतांच्या ‘नो युपीए’ विधानावरून काँगे्रसची टीकेची झोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ममतांच्या ‘नो युपीए’ विधानावरून काँगे्रसची टीकेची झोड

मुंबई/नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँगे्रसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद प

नवव्या मजल्यावरुन पडून मजुराचा दुर्दैवी अंत | LOK News 24
राज्यातील कुंभार समाजाचे प्रश्न मार्गी लावणार- भुजबळ
निकालानंतर 48 तासांत सरकार न बनल्यास राष्ट्रपती राजवट अटळ : संजय राऊत

मुंबई/नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँगे्रसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतल्यानंतर भाजपविरोधात तिसर्‍या आघाडीचे संकेत दिले. यावेळी बोलतांना ममता म्हणाल्या यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) आता अस्तित्वात नाही. तथापि, ममता यांनी सर्व समविचारी विरोधी पक्षांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध एकत्र येऊन लढण्याचे आवाहन केले होते. ममतांच्या या वक्तव्यांवर गुरूवारी संपूर्ण देशभर पडसाद उमटले असून काँगे्रसच्या नेत्यांनी ममताला चांगलेच फटकारले आहे.
यावर बोलतांना काँगे्रस नेते अधीर रंजन म्हणाले की, ममता बॅनर्जींना यूपीए म्हणजे काय हे माहित नाही का? मला वाटते की त्यांनी वेडेपणा सुरू केला आहे. त्यांना वाटते की पूर्ण भारत ‘ममता, ममता’ म्हणू लागला आहे. परंतु भारत म्हणजे बंगाल नाही आणि बंगाल म्हणजे भारत नाही. पश्‍चिम बंगालमधील मागच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वापरलेली युक्ती आता हळूहळू उघड होत आहेत, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसरी आघाडी तयार करण्याचा अनुषंगाने हालचाली सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यावर बोलतांना म्हणाले की, काँग्रेसशिवाय युपीएला काहीही अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे. कपिल सिब्बल यांनी ट्विट करून लिहिले की, काँग्रेसशिवाय युपीए म्हणजे आत्मा नसलेलं शरीर असेल.

काँगे्रसला सल्ला द्यावा, एवढी नवाब मलिकांची पात्रताच नाही : थोरात
युपीएचं अस्तित्व आहेच कुठे आहे, असा सवाल करणार्‍या ममता बॅनर्जींच्या टीकेला काँगे्रस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. अशा वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही. ममता बॅनर्जी आज युपीएच्या सदस्यही नाहीत. आतापर्यंत भाजपला जो विरोध केला आहे तो काँग्रेसने, युपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावे लागणार असल्याचे थोरात म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, नबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावे हे काही योग्य नाही. काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नसल्याचा पलटवार त्यांनी केला.

काँग्रेसचे नेतृत्व हा दैवी अधिकार नाही : प्रशांत किशोर
काँगे्रसच्या टीकेला प्रशांत किशोर यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस ज्या विचार आणि आणि जागेचे प्रतिनिधित्व करते ते मजबूत विरोधी पक्षासाठी आवश्यक आहे. परंतु काँग्रेसचे नेतृत्व हा एखाद्या व्यक्तीचा दैवी अधिकार नाही. विशेषत: अशा परिस्थितीत जेव्हा पक्ष गेल्या 10 वर्षांत 90 टक्के पेक्षा जास्त निवडणुका हरला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे नेतृत्व लोकशाही पद्धतीने ठरवू द्या, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी ट्विट करून राहुल गांधींना लक्ष्य केले.

COMMENTS