पुणे : भाजपला शह देऊन कसबा विधासभा मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात

पुणे : भाजपला शह देऊन कसबा विधासभा मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात महापलिकेच्या अधिकार्याला शिवीगाळ करणे त्यांना भोवले आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीनुसार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकार्याला शिवीगाळ करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या प्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे. भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तयांच्यावर टीका देखील केली होती.
COMMENTS