क्रिकेटचे सामन्याने नाही तर विकासाच्या कामाने शुभारंभ ; माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रिकेटचे सामन्याने नाही तर विकासाच्या कामाने शुभारंभ ; माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

अभिजित खंडागळे/पाथर्डी : शहरात पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून काही पक्षाने क्रिकेटचे सामने घेत शुभारंभ केला आहे.परंतु आम्ही विकासाच्या कामान

कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे : प्रवीण घुले
आशुतोष पठ्ठ्या कामाला माझ्यासारखाच
मनपातील महाविकास आघाडीला बसणार झटका ; काँग्रेस आणणार मंगळवारी आसूड मोर्चा

अभिजित खंडागळे/पाथर्डी : शहरात पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून काही पक्षाने क्रिकेटचे सामने घेत शुभारंभ केला आहे.परंतु आम्ही विकासाच्या कामाने पालिका निवडणुकीचा शुभारंभ करत आहोत अशी खोचक टीका खासदार डॉ. सुजय विखे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पाथर्डी शहरातील फुलेनगर परिसरातील पदपथ निर्मिती आणि धामणगाव रस्ता काँक्रीटीकरण या विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केली. यावेळी गोरक्ष शिरसाठ,शिवाजी खेडकर,उमाजी काकडे,नारायण बडे रशिदभाई शेख,रामनाथ फुदे सुभाष खेडकर,सुरेश मिसाळ, संजय इधाटे,मुरलीधर शिंदे, रामराव बडे,सुरेश इजारे,सूर्यभान दहिफळे,आदित्य इधाटे,अजिंक्य खेडकर,नामदेव खेडकर, बबन सबलस,दत्ता सोनटक्के,गणेश टेके,किशोर परदेशी,एजाजभाई शेख,पप्पूशेठ नरवणे,प्रशांत शेळके,ज्ञानेश्वर कोकाटे, जायभाय मेजर,गोल्हार सर, सुदर्शन खेडकर,सानप साहेब, ओम दहिफळे भोईटे साहेब नामदेव खेडकर तसेच प्रभागाचे नगरसेवक प्रसाद आव्हाड व दुर्गाताई भगत आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आव्हाड यांनी म्हटले की,नेहमी कामगाराच्या बाजूने उभी राहण्याची स्व.बाबुजी आव्हाड यांची शिकवण मला असून मी कोणालाही पाठीशी घालण्याचे काम मी करत नाही.येणाऱ्या नवीनवर्षात राजकीय वाटचालीची दिशा ठरवुन नागरिकांमधील संभ्रम अवस्था दूर करू.आजपर्यंत पाथर्डी शहराने भरपूर प्रेम दिले आहे.तसेच यापुढील काळात तुमची साथ लाभली तर शहरासाठी आणखी भरीव कामे केली जातील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण खेडकर तर आभार रामनाथ फुंदे यांनी मानले.

COMMENTS