Homeताज्या बातम्यासंपादकीय

वेडगळ विधान !

कामाचे तास किती असावेत या संदर्भात पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झालेले आहे. भारतात देखील कामगार मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबे

नवे वर्ष, नवा जल्लोष
दंगल पेटवण्याचे षडयंत्र ?
विकेंद्रीकरण की एकाधिकारशाही

कामाचे तास किती असावेत या संदर्भात पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झालेले आहे. भारतात देखील कामगार मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामाचे तास हे आठ असावेत, हे निकषच नव्हे तर हा कायदाच बनवला. पाश्चिमात्य देशांमध्ये तर मानसशास्त्रीय संशोधन होऊन, व्यक्तीसाठी कुशल आणि अकुशल कामाचे तास हे आठ पेक्षा जास्त असता कामा नये, ही प्रमाणबद्धता निश्चित करण्यात आली. लोकशाही मूल्य जोपासणाऱ्या फ्रान्सने फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतर ची मूल्य जोपासली, त्यामध्ये कामाचे तासही त्यांनी आठवड्याचे केवळ पस्तीस ठेवलेले आहेत. जगातल्या कोणत्याही देशांमध्ये असणारे हे कामाचे सर्वात कमी तास आहेत; तर, उत्तर कोरिया या हुकूमशाहीचे प्रमाण असलेल्या देशामध्ये आठवड्याच्या कामाचे तास १०५ आहेत. अर्थात, १०५ तास सक्तीने काम घेणारा उत्तर कोरिया हा आफ्रिकन देशांपेक्षाही खालच्या पातळीवर आहे; हे कोणीही नाकारू शकत नाही! खरेतर, पाश्चिमात्य देशांनी माणसाच्या मनाला अधिक प्रफुलित करण्यासाठी, त्याचे कामाचे तास कमी ठेवण्याबरोबरच त्याचे कामाच्या ठिकाणाचे वातावरणही अधिक सौंदर्य मूलक असावे, अशी काळजी घेतली. त्यामुळे, पाश्चिमात्य कंपन्यांच्या सभोवताली हिरवळ, बगीचे आणि विभिन्न प्रकारच्या विलोभनीय वास्तूंचेही निर्माण केले जाते. परंतु, भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून उद्योग जगतातील दोन लोकांनी वादग्रस्त विधाने करून स्वतःवरच टीका ओढवून घेतली आहे. यामध्ये इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी काही दिवसापूर्वी भारतीय लोकांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता; अर्थात, त्यांच्या या सल्ल्यावर समाज माध्यमांवर प्रचंड टीका झाली. त्या टिकेनंतर नारायण मूर्ती या विषयावर बोलेनासे झाले. परंतु, नुकतेच लार्सन अँड टुब्रो चे चेअरमन बनलेले एस एन सुब्रमण्यम यांनी कामाचे तास ९० असावे, अशी एक प्रकारे गरळ ओकली आहे. भारतात कामाचे तास ४० असताना दुपटीपेक्षाही अधिक म्हणजे जवळपास सव्वादोन पटींनी कामाचे तास वाढवण्याची गरज, ही केवळ भांडवली मानसिकतेतून नफा कमवणे आणि माणसाला दुर्लक्षित करणे, माणसाचे अधिकार नाकारणे, या घृणास्पद गोष्टींचेच प्रतिक आहे! मानवी जीवनामध्ये संघर्ष करूनच कोणत्याही गोष्टी स्थिर होतात. जगभरात कामाचे तास १६ ते १८ असताना जगभरातल्या नागरिकांनी संघर्ष करून आपल्या कामाचे तास दिवसाला आठ आणि आठवड्याला ४० पर्यंत आणलेले आहेत. अशावेळी पुन्हा रानटी अवस्थेकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे काम आधुनिक काळात आधुनिक व्यवसायाचे प्रमुख लोक करत असतील तर, ती बाब अतिशय लांच्छनास्पद आहे. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये, वेळोवेळी कामाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे. तर, कामगार उत्पादकता आणि वास्तविक वेतन वाढले आहे. १९०० मध्ये, अमेरिकन कामगारांनी त्यांच्या समकक्षांपेक्षा ५० टक्के जास्त काम केले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा अंदाज आहे की, २०१६ मध्ये जागतिक स्तरावर दहापैकी एक कामगार दर आठवड्याला ५५ किंवा त्याहून अधिक तास काम करत होता; आणि ७ लाख ४५ हजार व्यक्ती हृदयविकाराच्या घटनेमुळे किंवा स्ट्रोकमुळे मरण पावल्या. ज्याचे कारण इतके जास्त तास काम केले आहे, ज्यामुळे दीर्घ कामाच्या तासांचा संपर्क हा व्यावसायिक जोखीम बनून मानवी मृत्यू चे कारण बनले होते. यावरून, हे लोक काही बोध घेतील अशी अपेक्षा करूया!

COMMENTS