Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

औंध / वार्ताहर : डोहाळ जेवण आणि ओटीभरण हा सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा व आनंदाचा कार्यक्रम असतो. परंतू मानवी जीवनाप्रमाणे समाजातील पंशुवर जीव

चांदोली परिसरात मुसळधार पाऊस; 110 मिलिमीटर पावसाची नोंद
तंत्रशिक्षणाबरोबर व्यवस्थापन शिक्षणात देखील आरआयटी अग्रेसर : डॉ. सुषमा कुलकर्णी
संविधान दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

औंध / वार्ताहर : डोहाळ जेवण आणि ओटीभरण हा सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा व आनंदाचा कार्यक्रम असतो. परंतू मानवी जीवनाप्रमाणे समाजातील पंशुवर जीवापाड प्रेम करणारे काही लोक आपल्या अपत्याप्रमाणे सर्व लाड पूरवित असतात. असाच एका लक्ष्मी नावाच्या गाईचा कार्यक्रम औंधमध्ये झाला असून त्याची सगळीकडे चर्चा व कौतुक होत आहे.
औंध येथील तनपुरे कुटुंबीय शेती, पशुपालन, कोंबडी पालन व वडापावचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे. लहानपणापासून लक्ष्मी नाव ठेवलेल्या गीर जातीच्या गाईचा सांभाळ केला आहे. आपण आपल्या मुलाबाळांची हौसमौज करतो. मग लक्ष्मीची का नाही अशी घरगुती चर्चा झाल्यानंतर संतोष तनपुरे व किसन तनपुरे यांनी हा लक्ष्मीच्या नवव्या महिन्यात डोहाळ जेवण आणि ओटीभरण घरी आयोजित केला.
या कार्यक्रमाची त्यांनी निमंत्रण पत्रिका काढली, सर्व मित्र परिवार, पै-पाहुणे यांना निमंत्रण दिले. त्या सर्वांनी निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला हजेरी लावली, मंडप, लाऊड स्पीकर, येणार्‍या पाहुण्यासाठी सुंदर अशी भोजनाची व्यवस्था केल्यामुळे एखाद्या चांगल्या कार्यक्रमला लाजवेल अशी जोरदार व्यवस्था केल्यामुळे येणारे सर्व पाहुणे मित्र मंडळी आनंदात सहभागी झाले.
सध्याच्या युगात घरातील सदस्यांचे लाड पुरविताना कुटुंबप्रमुखांची दमछाक होते. मात्र, आपले असणारे पंशुवरील प्रेम दाखविण्यासाठी एवढा केलेला खर्च तनपुरे कुटुंबियांनी कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमासाठी औंध आणि पंचक्रोशीतील तसेच बारामती व इतर दूरच्या भागातून आलेल्या पै-पाहुण्यांची संख्या लक्षणीय होती.

COMMENTS