कोविड, लिंबू आणि भांडवलदार !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कोविड, लिंबू आणि भांडवलदार !

    लिंबू! आता चवच आंबट राहीली नाही, तर किंमतही आंबटली! आहारातील एखादा पदार्थ उन्हाळ्यात आंबट झाला तर तो खराब झाला म्हणून आपण टाकून देतो. पण एखाद्या

कोविड, लिंबू आणि भांडवलदार !
कोविड, लिंबू आणि भांडवलदार !
कोविड, लिंबू आणि भांडवलदार !

    लिंबू! आता चवच आंबट राहीली नाही, तर किंमतही आंबटली! आहारातील एखादा पदार्थ उन्हाळ्यात आंबट झाला तर तो खराब झाला म्हणून आपण टाकून देतो. पण एखाद्या वस्तूची चव मुळात आंबट असली तर ती आहाराचा पूरक भाग म्हणून आपण घेतो. यात कैरी, आवळा, ताक, चिंच हे पदार्थ घेतले जातात. पण मोठ्या प्रमाणात वापरला जातो तो लिंबू. सहसा मांसाहारी जेवणात, उन्हाळ्यात थंड शरबत पिण्यासाठी म्हणून लिंबूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु, कधी नव्हे तर यंदा लिंबूने किंमतीत एवढी मान उंचावली की, घेणाऱ्यांनी मानच टाकावी एवढा महाग! पंधरा रूपयाला एक नग. बाजारात एवढ्या पैशात गरीबाच्या कुटूंबाला पुरेल एवढी भाजी मिळते. अर्थात भाजी म्हणजे भाजी बनविण्यासाठीचा भाजीपाला! लिंबू हे फळ लहानपणापासून आपण पाहतो. पण, त्याला फळ म्हणून विकत घेऊन खावं अशी इच्छा कुणाची झाल्याचे आठवत नाही. गावाकडे तर लिंबू विकत घेणं ही बाब तशी दुर्मिळच! शक्यतोवर शेजारच्याच्या अंगणात, शेतात, मळ्यात असणाऱ्या झाडावरून तोडून घेणे, हाच पर्याय वापरला जाणारा. आता यापुढे असं काही केलं तर गोफणीचा दगड भिरभिरत येईल! कारण पहिल्यांदा लिंबूने शेतकऱ्यांना जाणीव करून दिली की, लिंबू हे आता नगदी कमाई देणाऱ्या फळांच्या यादीत जाऊन बसले. मात्र, खरा प्रश्न हा निर्माण झाला की, असे काय झाले की, एकाएकी लिंबूच्या किंमती अशा गगणाला भिडल्या? गेल्या दोन वर्षापासून जग कोविडच्या साथीने अक्षरशः पिळले गेले आहे. या महामारीपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘सी’ व्हिटॅमिन चा समावेश आहारात करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिल्याने ‘ सी’ च्या गोळ्यांनी जगाच्या औषधी बाजारपेठेचा ताबाच घेतला. भांडवलदारी जगताने किंबहुना आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास काॅर्पोरेट जगताने सी व्हिटॅमिन च्या गोळ्यांच्या किंमती प्रचंड भडकलेल्या होत्या. या गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी उत्पादन अपुरे पडायला लागले तेव्हा मग भांडवलदारांच्या हस्तकांनी एक रहस्य बाहेर आणले अन् ते म्हणजे लिंबू – आवळा या फळांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेले सी’ व्हिटॅमिन प्रचंड प्रमाणात आहे. या वाक्याने लोकांवर एवढा प्रभाव पडला की, घरोघरी लिंबूची खरेदी सुरू झाली. आरोग्याच्या दृष्टीने लोकांमध्ये आलेली ही सजगता भांडवली जगाच्या लक्षात आली नसती तरच नवल! आज लिंबू बाजारपेठेत महाग होण्याला हे सर्वात मोठे कारण ठरले. अर्थात, शेतकऱ्यांनी पिकविलेल्या एखाद्या उत्पादनाला चांगली किंमत मिळत असेल तर ते स्वागतार्हच आहे. परंतु, पिकवणाऱ्या शेतकऱ्याला याचा काही लाभ मिळत नाही. आता देशात सर्वत्र भांडवलदारांची शितगृहे मोठ्या प्रमाणात उभारली गेली आहेत. या शीतगृहांमध्ये नाशवंत वस्तू आणि फळे साठवणूकीची व्यवस्था झाल्याने पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल यात साठवणूक करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करणारे भांडवलदार वस्तूंच्या किंमती ठरवून बाजारात आणतात. वास्तविक, भारतात लिंबू चे उत्पादन दहा राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. लिंबू उत्पादनात देशात सर्वात आघाडीवर असणारे राज्य म्हणजे आंध्रप्रदेश. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे गुजरात आणि महाराष्ट्र येतात. वर्षभरात भारतात जवळपास चाळीस लाख टन एवढे उत्पादन होते. साधारण दोन प्रकारच्या प्रजाती भारतीय उत्पादनात दिसतात – लेमन आणि लाईम. लाइम प्रवर्गातील लिंबू हा छोटा आणि हिरव्या रंगाचा असतो तर लेमन हा बारीक सालीचा कागदी लिंबू म्हणूनही त्याला आपण ओळखतो. वर्षभरात एकाच झाडाला तीन बहार देणारा लिंबू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर नेण्याची किमया नवभांडवलदा करित आहेत. परंतु, कालांतराने याचा फटका या भांडवलदारांना बसल्याशिवाय राहणार नाही. भारत ही मोठी बाजारपेठ असल्याचा दृष्टिकोन ठेवून विकसित देश भारतात आपला व्यावसायिक विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवत असताना भारतीय भांडवलदार ग्राहकांच्या आवाक्याबाहेर वस्तुंच्या किंमती गेल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करतात. लोकांची खरेदी शक्ती संपली तर या भांडवलदारांची श्रीमंतीत वाढ होईल अशी? हा साधा प्रश्न देखील या भांडवलदारांना पडत नसावा का?

COMMENTS