धावत्या विदर्भ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन युगुलाची आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धावत्या विदर्भ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन युगुलाची आत्महत्या

बुलडाण्यातील धक्कादायक घटना

बुलढाणा - जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानका(Shegaon Railway Station)पासून जवळच एका तरुण - तरुणीने रात्री शेगाव ते नागझरी दरम्यान नागपूरहुन मुंबईकडे ज

छ.संभाजीनगरमध्ये 3 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
४७ वर्षीय महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
पोलिस नियंत्रण कक्षातील महिला पोलिसाची आत्महत्या

बुलढाणा – जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानका(Shegaon Railway Station)पासून जवळच एका तरुण – तरुणीने रात्री शेगाव ते नागझरी दरम्यान नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या सुपरस्टार एक्स्प्रेस खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे. यातील मृतक तरुण हा जवळच असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील कवठलं गावचा २२ वर्षीय अजय असल्याची ओळख पटली आहे. तर १४ वर्षीय युवती ही त्याच परिसरातील असल्याचं पोलिसांनी (Police) सांगितलं आहे. दरम्यान दोघांची ओळख पटली असून दोघे प्रेमी युगुल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून यातील मुलगी ही फक्त १४ वर्षांची असून युवक २२ वर्षांचा आहे. दोघेही जवळच्या संग्रामपूर तालुक्यातील कवठल परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली , मात्र त्यांनी आत्महत्या का केली…? यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. ही आत्महत्या आहे की घातपात यावर आता पोलीस तपास करीत आहेत, शेगाव रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधी नोंद घेऊन तपास सुरू आहे.

COMMENTS