Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिमायतनगर तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार

कामे होऊन ही थेंबभर ही पाणी मिळेना?

हिमायतनगर प्रतिनिधी - तालुक्यातील अनेक गावे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसतआहेत. सामान्य माणसाची तहान भागवण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन या यो

जलजीवन मिशन योजनतेतील कामांमध्ये घोटाळा
जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामाची चौकशी करा

हिमायतनगर प्रतिनिधी – तालुक्यातील अनेक गावे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसतआहेत. सामान्य माणसाची तहान भागवण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन या योजनेची मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात केलेलीआहे.तालुक्यातील एकुण 24 गावासह मौजे दाबदरी,एकघरी,कौठा जहागीर,कौठा तांडा,वाडी,किरमगाव, पिछोंडी,मोरगावला कामे सुरू झालीआहेत.ही योजना प्रत्येक गावात राबवुन या योजनेवर लाखो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी टाकी उभारण्यात येतआहेत.तर घरोघरी नळ जोडणी देण्यात येत आहे.मात्र अनेकाच्या घरी थेंबभर ही पाणी पोहोचत नसल्याची भीषण चित्र संबंध तालुक्यातील गावांमध्ये दिसून येत आहे.गावाची लोकसंख्या नुसार प्रत्येक घरात वैयक्तिक नळ देण्याचे नियोजन योजनेत प्रस्तावित आहे.तसेच प्रत्येक घराला नळ जोडणी सुद्धा केली जाते आहे.ज्यांच्या घरी नळजोडणी पोचली आहे.त्यांच्या घरी पाणी अद्याप पोहोचले नसल्याची गंभीर बाब गावातील अनेक लोकांनी यावेळी बोलुन दाखवले आहे.त्या गावातील संबंधित गुत्तेदारांनी नियमाने कामे केली नसल्याने ग्रामपंचायतीच्या काही सदस्याचे म्हणणेआहे.तर पाईपलाईन टाकत असताना किमान तीन फूट खोली अपेक्षितअसताना मात्र,काही गावात तर कोठे एक,तर कोठे दीड फुटापर्यंत पाईपलाईन टाकून गुत्तेदार मोकळे झाल्याने घरोघरी पाणी व्यवस्थित पोहचेल की,नाही? याची शाश्वती राहिलेली नाही.तर नळाची, पाईपच्या तोट्या व अन्य साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे वापर केला असल्यानेच अल्पावधीतच हे साहित्य जागोजागी तुटून पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.सदरील कामे थातुर माथुर पद्धतीने करून जिल्हा जलसंधारण अधिकारी, मुद्ध जलसंधारण विभागआणि कार्यकारीअभियंता,ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड कडून प्रत्येक गावातील कामाची    गुणवत्ता व तांत्रिक पथका मार्फत  उलट तपासणी केल्याशिवाय उर्वरित देयके रक्कम देऊ नये,अश्या अनेक गावंच्यां तक्रारी,निवेदनाद्वारे मागणी करुनही,संबंधित गुत्तेदार बिले देण्याचे काम प्रभारी उपविभागीय अभियंता तथा शाखा अभियंता सतीश हिरप हे करत असल्याचा प्रकार तालुक्यात दिसून येतअसल्याचाआरोप,त्या-त्या गावातील नागरिकांतुन वेळोवेळी केला जातआहे.शासनाच्या नियमाप्रमाणे प्रतिव्यक्ती55 लिटर पाणी प्रत्येकाला मिळणे हे अपेक्षित आहे.मात्र अनेक घरी पाच ते सहा सदस्य असलेल्या कुटुंबालाच 50 लिटर पाणी मिळत नसल्याचा आरोप सुद्धा गावकरी वर्गातून होतआहे.परंतु तालुक्यात जलजीवन मिशनची कामे करणार्‍या गुत्तेदारांनी या नियमाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केलेलेआहे.यास मुक सहमती देत असल्याचे प्रभारी उपविभागीय अभियंता,शाखा अभियंता,ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय हदगाव यांच्यावर गंभीर आरोप होतोआहे.मात्र उन्हाळा सुरु होऊन कामे थोडी बहुत संथगतीने  सुरु होती.तर काही कामे प्रलंबित असल्याचे कळते आहे.उन्हाळ्यात प्रत्येक गावातील,वाडी,तांड्यावर नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतआहे.यामुळे जलजीवन मिशनची कामे चांगल्या पद्धतीने टाकाऊ,दर्जेदार करण्यासाठी व वेळेत करणे अपेक्षित होते.यासाठी कार्यकारीअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यालय जिल्हा परिषद नांदेड यांनी वेळोवेळी प्रत्येक गावातील कामाची तपासणी करून गुत्तेदारांला सक्तीने व चांगले कामे करण्यासाठी प्रवर्तन करणे,चुकीचे कामे करणार्या गुत्तेदारांची बिले रोखुन धरणे सुद्धा गरजेचे आहे.परंतु याकडे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा तथा जिल्हा जलसंधारण विभाग जिल्हा परिषद नांदेड जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या कामात गुत्तेदार हलगर्जीपणा करुन मनमानी पद्धतीने कामे करून घेतआहेत.प्रत्येक कामाचे संपूर्णपणे बिले उचलण्याचा  सपाटा सुरु करण्यातच धन्यता मानतआहे.यामुळे जलजीवन मिशनचा आलेला कोटी रुपयांचा निधी पुन्हा एकदा पाण्यातच जातो की गुत्तेदाराच्या घशात जात आहे काय?अशी परिस्थिती हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली आहे.याकडे श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे,  प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी वेळेवर लक्ष देऊन कामे व्यवस्थित होतआहे की,नाही?याची खातर जमा करणे गरजेचे झाले आहे.परंतु कामे तपासणी करणारी यंत्रणाअद्याप उभी केलेली नाही,ही जनतेसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.

COMMENTS