मनपाचे प्रस्तावित रुग्णालय…शाळेच्या आरक्षित जागेवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाचे प्रस्तावित रुग्णालय…शाळेच्या आरक्षित जागेवर

शासनाकडे तक्रार, मनपा आयुक्तांकडून मागवला अहवाल

अहमदनगर/प्रतिनिधी : शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर महापालिकेद्वारे सुमारे 26 कोटींचे टोलेजंग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला असला तरी तो कायदेशीर

जिया अग्रवालने बारावीत मिळवले 94 टक्के गुण
शेतीमध्ये सेंद्रीय खतांचे प्रमाण वाढवणे गरजेचे ः डॉ. दुरगुडे
कोपरगाव शहरात हप्ता वसुलीतून हाणामारी ? कोपरगावात गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर महापालिकेद्वारे सुमारे 26 कोटींचे टोलेजंग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला असला तरी तो कायदेशीर अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. येथील लोककार्य आणि लोकक्रांती दलाचे अध्यक्ष हेमंत ढगे यांनी नगर विकास विभागाकडे याबाबत तक्रार केली असून शासनाने याची दखल घेत महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम व महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार शाळेचे आरक्षण असलेल्या जागेत रुग्णालयाची उभारणी कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याने रुग्णालयाच्या उभारणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ढगे यांनी शासनाकडे केली आहे तसेच रुग्णालयासाठी 26 कोटी 70 लाखाचा प्रस्ताव मंजूर झालेला असताना 23 कोटी 84 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. जीएसटीची रक्कम एकत्रित करूनही कामाच्या मंजूर रकमेत व निविदेच्या रकमेत तफावत आढळून येते. या कामात 30 टक्के हिस्सा महापालिकेचा असून त्याची तरतूद मनपाच्या अंदाजपत्रकात करण्यात आलेली नाही तसेच महापालिकेने 84 लाख रुपये ज्यादा दराने ही निविदा मंजूर केलेली आहे, असे आक्षेपही ढगे यांनी तक्रारीत मांडले आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी एम. के. बागवान यांनी महापालिका आयुक्तांना आवश्यक सर्व कागदपत्रांसह वस्तुनिष्ठ अहवाल स्पष्ट अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही शासनाने दिले आहेत.

मनपाची होणार अडचण
महापालिकेने कोट्यवधी रुपयांची निविदा प्रसिद्ध करून बुरुडगाव रोड येथे प्रस्तावित केलेल्या नवीन रुग्णालयाची उभारणी कायदेशीर अडचणीत सापडणार आहे. शाळेचे आरक्षण असतानाही त्या जागेवर रुग्णालयाची उभारणी केली जात असली तरी जिल्हा नियोजन मंडळामार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून बुरुडगाव रोड येथील महापालिकेच्या जागेत रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मध्यवर्ती नगर शहरात असलेल्या मनपाच्या बाळासाहेब देशपांडे प्रसुतीगृहासाठी देण्यात आलेला सुमारे 10 कोटीचा निधी या नव्या रुग्णालयाच्या कामासाठी वळवण्यात आलेला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन स्थायी समितीकडून निविदाही मंजूर करण्यात आली आहे. मात्र, ज्या जागेवर रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे, त्या जागेवर प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. महापालिकेने रुग्णालयाची मंजुरी करताना त्या जागेवरील प्राथमिक शाळेचे आरक्षण शासनाकडून रद्द करून घेणे आवश्यक होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत ठराव होऊन, तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणे क्रमप्राप्त होते. महापालिकेने या कुठल्याही नियमाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या शाळेचे आरक्षण असलेल्या जागेत रुग्णालयाची उभारणी करणे उचित नाही, असे ढगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

त्याऐवजी होणार हे काम…
मनपाच्या बाळासाहेब देशपांडे सुतिकागृह दवाखान्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झालेला आहे व त्या जागेवर नव्याने रुग्णालय इमारत बांधण्याच्या कामास मंजुरी मिळालेली असताना, तेथेे काम न करता त्याऐवजी शाळेचे आरक्षण असलेल्या जागेत रुग्णालयाचे काम करण्याबाबतचा व देशपांडे रुग्णालयाच्या कामाचा मंजूर निधी या नव्या रुग्णालय कामाकडे वळवण्याचा निर्णय मनपा पदाधिकारी व प्रशासनाने घेतला आहे.

COMMENTS