महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा : राजेश टोपे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा : राजेश टोपे

मुंबई/प्रतिनिधी : कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण वाढवण्याची मागणी केंद्र सरकार करत असले तरी, महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्य

गोदावरी अभ्यास गटाने चार आठवड्यात अहवाल तयार करावा उच्च न्यायालयाचे आदेश : आ. आशुतोष काळे
कृषी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी दिशा दर्शक ठरेलः मुख्यमंत्री शिंदे
राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण

मुंबई/प्रतिनिधी : कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण वाढवण्याची मागणी केंद्र सरकार करत असले तरी, महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे. केंद्राकडे कोविशील्डचे 50 लाख तर कोव्हॅक्सिनच्या 40 लाख डोसची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. अनेक जिल्ह्यांमधून आरोग्य खात्याकडे लशीची मागणी होतेय. त्यामुळे आता लशीचे 90 लाख डोस उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे टोपे म्हणालेत. ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर अनेक जण लसीकरण केंद्रात लस मिळवण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. मात्र अपुरी लसीचा पुरवठा असल्यामुळे विविध ठिकाणी या लसी मिळवण्यात अडचणी येतांना दिसून येत आहे.

COMMENTS