गेल्या काही दिवसांपासून लग्न समारंभ किंवा मिरवणुका, रॅली अशा वेगवेगळ्या ठिकाणी समावेश असणाऱ्या तरुणांचा एकाएकी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लग्न समारंभ किंवा मिरवणुका, रॅली अशा वेगवेगळ्या ठिकाणी समावेश असणाऱ्या तरुणांचा एकाएकी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुण अभिनेत्याचा व्यायाम करण्याचे ठिकाणी म्हणजे जिम मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर अशा अनेक घटना समोर आल्या. यावरून तर्क-वितर्क देशभरात करण्यात येऊ लागले. सर्वसामान्य जनतेमध्ये असा समज निर्माण झाला की, कोरोना नंतरच्या काळामध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी ज्यांनी लस घेतली, अशा तरुणांचा यात मृत्यू झाला असावा; असा संशय लोकांच्या मनात निर्माण झाला. यावर तथ्य शोधून शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून सत्य काय ते बाहेर आणावे, या उद्देशाने भारताची अग्रगण्य वैद्यकीय संस्था इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर या संस्थेने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. आयसीएमआर ने सर्वात प्रथम कोरोना लस घेणाऱ्यांचा अशा प्रकारे कोणताही मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु, अनेक वेळा सामुहिक नृत्य करत असताना, लग्नाच्या वरातीमध्ये नृत्य करत असताना, काही दिवसांपूर्वी तर एक सुप्रसिद्ध गायक के के सारख्या मोठ्या गायकाचाही मंचावरच मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना देशभरात घडत राहिल्या. परंतु, यामध्ये कोणताही मृत्यू कोरोनाची लस घेतली म्हणून झालेला नसल्याचे स्पष्टपणे आपल्या अहवालात आयसीएमआरने म्हटले आहे. आय सी एम आर ने मात्र एक गोष्ट निश्चितपणे स्पष्ट केली आहे की, मिरवणूक, वरात, सामुहीक नृत्य, लग्न समारंभ, अनेक जयंतीच्या मिरवणुका असतील अशावेळी डीजेच्या तालावर नाच करणाऱ्या तरुणांचा, अति आवाजामुळे हार्ट अटॅक होऊन मृत्यू होतो, असे बिंबवले आहे. डीजे सारख्या वाद्याला देशभरात विरोध होत असताना, तरुणाई मात्र त्या तालावर नाचण्यासाठी बेभान होते. एक मात्र नक्की की, डीजे या वाद्याच्या माध्यमातून जो आवाज येतो, तो कोणत्याही स्फोटकाच्या आवाजापेक्षा कमी नसतो. कोणत्याही ठिकाणी स्फोटाची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीच्या धक्क्यानेच माणसांचा मृत्यू होतो. ही वस्तुस्थिती आहे. तत्वतः डीजे मधून चे आवाज किंवा ध्वनी जे अतिशय भयावह पद्धतीने बाहेर पडतात, त्याचा ठोका मानवी शरीरावर बसतो आणि तो जर नाजूक किंवा कमजोर हृदयाच्या लोकांना किंवा हृदयाच्या भागाकडे जर तो धक्का बसला तर, अशावेळी मृत्यू होण्याचे कारण निश्चितपणे वाढते. हे यातून समोर येऊन पाहते आहे. डीजेवर बंदी आणण्याचे अनेक नियम केले गेले आहेत. आवाजाची डिसिबल कमीत कमी ठेवण्यात यावी; परंतु, आजही ग्रामीण भागात डीजे चा आवाज सहन न होण्याइतपत असतो. ग्रामीण भागातील संयोजक, लग्न करणारी मंडळी हे तर दुर्लक्ष करतातच, पण, त्यातल्या त्यात संबंधित ठिकाणची काळजी घेण्याचे काम या पोलीस अथवा सुरक्षा यंत्रणेने करायला हवं, ते देखील यावर लक्ष ठेवून राहत नाही. डीजेची परवानगी देऊन मोकळे होतात. आयोजक किंवा संयोजक काहीतरी लिहून देतात. ग्रामीण भागात ते मोजण्याचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील वृद्ध हे मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असतात. त्यांना तर त्रास होतोच होतो; पण त्याबरोबर त्या वाद्यावर थिरकणारी तरुणाई, त्यांनाही यामुळे मोठ्या प्रमाणात धोका उद्भवू शकतो. अर्थात, हल्लीची जीवनशैली, खानपान, सोशल मिडियामुळे दीर्घकाळ जागरण, फास्टफूड चे सेवन या गोष्टींमुळे तरूणाई धोक्यात आली आहे. यावर सर्वांनी आपापल्या जीवन पध्दतीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
COMMENTS