Homeताज्या बातम्याविदेश

चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार

अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा

बीजिंग/वृत्तसंस्था - कोरोनाच्या लाटेतून संपूर्ण जग बाहेर येत असतांनाच, चीनमध्ये कोरोनाचा कहर अजूनही काही थांबण्यांची चिन्हे दिसेनात. चीनमध्ये को

झुकणारे पाहणी अहवाल !
आर्थिक विषमता रोखण्यात मोदी सरकार अपयशी – अतुल लोंढे
भातकुडगाव फाटा कडकडीत बंद

बीजिंग/वृत्तसंस्था – कोरोनाच्या लाटेतून संपूर्ण जग बाहेर येत असतांनाच, चीनमध्ये कोरोनाचा कहर अजूनही काही थांबण्यांची चिन्हे दिसेनात. चीनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, 2 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या बीजिंगमध्ये काल कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठ्या संख्येने मजूर आणि चालकांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आली आहे, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. अलीकडेच देशात ’झिरो कोविड पॉलिसी’ विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला. यानंतर चीनने अचानक आपला कोविड व्यवस्थापन प्रोटोकॉल बदलला. सतत चाचणी, लॉकडाऊन आणि कठोर प्रवास निर्बंधांसह, चीन कोविड साथीच्या आजाराचा सामना करत आहे. देशाने आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येला सांगितले आहे की, सौम्य लक्षणं असल्यास घरांमध्येच स्वत: ची काळजी घ्यावी. बीजिंगमध्ये 7 डिसेंबर रोजी कोविड व्यवस्थापन धोरणांमध्ये बदल झाल्यापासून, कोविडमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोना व्हायरसचा पार्लर, रेस्टॉरंट आणि कुरिअर फर्म्सपासून अधिक सेवांमधील मजूर आणि कर्मचार्‍यांवर परिणाम झाला आहे. मियुन स्मशानभूमीतील एका कर्मचार्‍याने सांगितले, आमच्याकडे आता कमी कर्मचारी आहेत. तसेच अंत्यसंस्कार सेवांची मागणी वाढत आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आठवड्यापूर्वी झिरो कोविड पॉलिसी शिथिल करण्यात आली होती, त्यानंतर आता प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, चीनची आरोग्य यंत्रणा रुळावरून घसरत आहे.

COMMENTS