Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एच 3 एन 2’सह कोरोना बाधित रुग्णाचा नगरमध्ये मृत्यू

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क

अहमदनगर/प्रतिनिधी : देशात नव्याने आढळलेल्या ’एच 3 एन 2’ विषाणूसह कोरोना बाधित असलेल्या रुग्णाचा नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

शहराची वाट लावण्यात महापालिकेचे योगदान सर्वाधिक
पत्रकारांनी नव्या संधीचा शोध घेतला पाहिजे – वसंत मुंडे
वीजपंप चोरून नेतांना तीन चोरट्यांना रंगेहात पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी : देशात नव्याने आढळलेल्या ’एच 3 एन 2’ विषाणूसह कोरोना बाधित असलेल्या रुग्णाचा नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. एका मेडिकल कॉलेजचा तो विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्या संपर्कातील 19 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरागे यांनीही या घटनेला दुजोरा देताना जिल्हा आरोग्य प्रशासनाला याची माहिती देण्यात आल्याचे सांगितले.

देशभरात ‘एच 3 एन 2’ या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. नगरमध्येही संशयित रुग्ण आढळून आला. तो मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असून, बाहेर फिरून आल्यानंतर त्याला फ्ल्यूची लक्षणे दिसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एन्फ्लूएंझा ए, ’एच 3 एन 2’सह तो कोरोना बाधित असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. तिन्हीपैकी कोणत्या आजाराने त्याचा मृत्यू झाला, याची माहिती घेत आहोत व त्याच्या संपर्कातील 19 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. बोरगे यांनी सांगितले.

दरम्यान, अशा रुग्णांमध्ये सर्दी व खोकल्याची प्राथमिक लक्षणे दिसतात. त्यामुळे सर्दी व खोकला असलेल्या व्यक्तींनी दुर्लक्ष न करता उपचार घ्यावेत. सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS