शेवगाव : बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेचे नेते ऍड.शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती

शेवगाव : बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेचे नेते ऍड.शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने आझाद मैदान येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देऊन शेवगाव तालुक्यातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न यावेळी मांडण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यातील हजारो बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगार कार्यकर्त्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी घोषणाबाजी करत मैदान दणाणून सोडले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकर पुजारी यांच्यासह कॉ. प्रमोद बोराडे (चंद्रपूर), नितीन टिके (सातारा), हिंदुराव गायकवाड (सातारा), संदीप खंदारे (अकोला), खाजा सय्यद (अकोला), यांच्यासह जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव-पाथर्डीचे सुनील दारकुंडे (शेवगाव), संतोष बेलदार व राजेंद्र दिवटे (सांगली) इत्यादी प्रमुख नेत्यांनी केले.
जनशक्ती श्रमिक संघाचेवतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री यांना देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, मागील एक वर्षापासून प्रलंबित सर्व अर्ज तात्काळ मंजूर करावे. लोकसेवा हक्क हमी कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. प्रसूती व प्रसूती शस्रक्रिया सहाय्य योजना पूर्ववत सुरु करावी. नुतनीकरण अर्जाच्या पडताळणीचा कालावधी कमी करावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बंद असलेली नविन नोंदणी योजना पूर्ववत करावी. नोंदीत बांधकाम कामगारांची राहिलेली आरोग्य तपासणी करणे. सन २०२५-२६ या वर्षाचे लाभाचे व शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजूर करावेत अशा अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी आकाश फुंडकर कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने देण्यात आले.

COMMENTS