Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाळवंडी ते बीडला जोडणार्‍या 3 कोटी रूपयाच्या पुलाच्या कामाला सुरूवात

आ.संदीप क्षीरसागरांनी कामाची केली पाहणी

बीड प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षापासून बीड मतदार संघातील नाळवंडी येथील रामा 55 ते म्हाळसजवळा-बोरफडी-येळंब रस्ता प्रजिमा मार्ग 31 कि.मी.6/00 नाळव

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स स्पर्धेसाठी निवड
राहुरीत अक्षता मंगल कलशाचे जल्लोषात स्वागत
आकडे बहाद्दरांविरुध्द महावितरणची धडक मोहीम

बीड प्रतिनिधी – गेल्या अनेक वर्षापासून बीड मतदार संघातील नाळवंडी येथील रामा 55 ते म्हाळसजवळा-बोरफडी-येळंब रस्ता प्रजिमा मार्ग 31 कि.मी.6/00 नाळवंडी या भागात एक पुल येत असून या पुलाची दुरावस्था झाली होती. या बाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या पुलाकरिता 3 कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून घेतला असून आज या पुलाच्या प्रत्यक्ष कामाची सुरूवात करून पावसाळ्यापुर्वी या पुलाचे काम पुुर्ण करावे अशा सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला आ.संदीप क्षीरसागर यांनी केल्या आहेत.
नाळवंडी हे गाव मोठ्या लोकसंख्येचे असून या गावातून जाणारा पुल दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापितांच्या राजकारणामुळे यापुलाची दयनीय अवस्था झाली होती. शेतकर्यांच्या दृष्टीने हा पुल परिसरातील नाळवंडी आणि परिसरातील शेतकर्यांना आपल्या शेतमालाची विक्री करणेकरिता या पुलाचा वापर करणे गरजेचे असते. पण पावसाळ्याच्या काळात नदीला पुर आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोे आणि शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून राज्य शासनाकडून या पुलाकरिता 3 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आणि याचे आज भूमिपुजन करून प्रत्यक्ष कामाची पाहणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली. यावेळी नाळवंडी व परिसरातील सरपंच, उपसरपंच, अधिकारी, कंत्राटदार, ग्रामस्थ, शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

COMMENTS