Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडशाखीय वाणी समाजाच्‍या वतीने इंग्‍शिल मिडीयम स्‍कूल, अभ्यासिकेचे उभारणी

२४ फेब्रुवारीला भुमिपूजन समारंभ

नाशिक: लाडशाखीय वाणी समाजातर्फे गेल्‍या ४० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून लाडशाखीय वाणी समाज धर्मदाय व शैक्षणिक मंडळ, पंढरपुर यांच्‍या माध्यमातून

लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के
रविकांत तुपकर यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी काँग्रेसची निदर्शने 
इंडिया आघाडीकडून संख्याबळासाठी जुळवाजुळव

नाशिक: लाडशाखीय वाणी समाजातर्फे गेल्‍या ४० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून लाडशाखीय वाणी समाज धर्मदाय व शैक्षणिक मंडळ, पंढरपुर यांच्‍या माध्यमातून धर्मशाळा चालविली जाते आहे. पंढरपुर येथील संस्‍थेच्‍या दोन धर्मशाळांचा हजारो भाविकांना फायदा होतो आहे. अध्यात्‍म क्षेत्रासोबत आता शैक्षणिक क्षेत्रातही संस्‍थेच्‍या वतीने योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार नाशिकमध्ये इंग्‍शिल मिडीयम स्‍कूल तसेच स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व इतर विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातील. या शैक्षणिक संकुलाचा भुमिपूजन समारंभ येत्‍या २४ फेब्रुवारीला केला जाईल, अशी माहिती संस्‍थेचे अध्यक्ष अरुण शिरोडे, उपाध्यक्ष बी. टी. बधान, चिटणीस विलास शिरोरे, खजिनदार संजय मालपुरे , निलेश मकर यांनी इंदिरानगर येथील हॉटेल एनराईज बाय सयाजी येथे झालेल्या पत्रकार परीषदेत दिली.

*अध्यक्ष अरुण शिरोडे* म्‍हणाले, वारकरी बांधव, भाविकांसाठी ४० वर्षांपासून पंढरपुरमध्ये धर्मशाळांतून योगदान दिले जाते आहे.  गाथा, पारायण सोहळ्यांचे येथे आयोजन केले जातांना समाज प्रबोधनाचे काम केले जाते. संस्‍थेमार्फत तिसरी धर्मशाळा सुरु करण्याचा विचार होता, व त्‍याअनुषंगाने जागादेखील घेतली होती. परंतु सध्या पंढरपुरमध्ये अनेक समाज, शासन, निमशासनाच्‍या धर्मशाळा आहेत. त्‍यामुळे संस्‍थेच्‍या सेवाकार्याचा विस्‍तार करतांना शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

*उपाध्यक्ष बी. टी. बधान* म्‍हणाले, आडगाव परीसरातील जागेत येत्‍या २४ फेब्रुवारीला या शैक्षणिक संकुलाचा भुमिपूजन समारंभ आयोजित केला आहे. संस्‍थेतील ज्‍येष्ठ मान्‍यवर, दानशूर व्‍यक्‍ती या समारंभाला उपस्‍थित राहाणार आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये इमारतीचे बांधकाम केले जाईल.

*चिटणीस विलास शिरोरे* म्‍हणाले, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इंग्‍शिल मिडीयम स्‍कूलमध्ये प्रवेश सुरु करण्याचा मानस असेल. ही शाळा परीसरातील सर्व विद्यार्थी, सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांसाठी खुली असेल. हा प्रकल्‍प वाणी समाजातील दानशूर व्‍यक्‍तींच्‍या मदतीने साकारला जात असल्‍याने अभ्यासिका किंवा अन्‍य शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी वाणी समाजातील उमेदवारांचा प्राधान्‍याने विचार केला जाईल.

*खजिनदार संजय मालपुरे* म्‍हणाले, समाजातील दानशूर व्‍यक्‍तींच्‍या सहकार्याने शैक्षणिक संकुलाची उभारणी केली जाते आहे. तसेच शिक्षणक्रम सुरु करण्यासंदर्भात शिक्षण समितीची स्‍थापना केली आहे. कुठल्‍या स्‍वरुपाचे अभ्यासक्रम सुरु करता येऊ शकतात, याच्‍या सूचना या समितीकडून मागविल्‍या आहेत. त्‍यानुसार शिक्षणक्रम सुरु करण्याकडे कल असेल.

या प्रकल्‍पाच्‍या यशस्‍वीतेसाठी विश्‍वस्‍त निलेश मकर, प्रशांत सोनजे,

डॉ.गुलाबराव वाणी,अशोक आबा सोनजे ,काळु पाटकर,अँड राहुल खुटाडे,मनोज कोतकर, मिलिंद शिरोडे, सुशिल बागड, रमेश मुसळे, विजय शिनकर, देवा मुसळे,  अनिल चितोडकर, शरद मोराणकर, अनिल शिनकर, सुरेश बागड, सुरेश मुसळे, दीपक मालपुरे, पी. टी. नानकर, वसंत वाणी, विनोद कोठावदे,निबां  सोनजे, महेश शिरोरे 

यांच्‍यासह इतर समाज बांधव परीश्रम घेत आहेत.

*चौकट*

*शैक्षणिक संकुलातील वैशिष्ट्ये*-

शैक्षणिक संकुलाच्‍या तळमजल्‍यावर १०० क्षमतेच्या सभागृहाची उभारणी

* १२०० स्‍क्‍वेअर फुट जागेत ग्रंथालय, अभ्यासिका उभारणार

* अभ्यासिकेत स्‍पर्धा परीक्षेसाठी आवश्‍यक ग्रंथसंपदा असेल उपलब्‍ध

* कौशल्‍याधीष्ठीत शॉर्टटर्म कोर्स सुरु करण्यावर असेल भर

* आवठड्याच्‍या शेवटी शनिवारी, रविवारी राबविले जातील प्रशिक्षण उपक्रम

COMMENTS