Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संविधान लोकशाही प्रजासत्ताकाचा भक्कम पाया : राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली : तब्बल 75 वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदना’च्या मध्यवर्ती सभागृहात संविधान सभेने नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासाठी संविधान तयार

सन १९९६ चे वर्ल्डकप विजेते श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांचे ठाणे शहरात स्वागत 
दसरा मेळाव्याचा संघर्ष !
समझदार सभी जानते है….. बिसलेरी !

नवी दिल्ली : तब्बल 75 वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदना’च्या मध्यवर्ती सभागृहात संविधान सभेने नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासाठी संविधान तयार करण्याचे अतिभव्य कार्य पूर्ण केले. त्या दिवशी संविधान सभेच्या माध्यमातून आपण भारतातील जनतेने हे संविधान स्वीकारले, अधिनियमित केले आणि स्वतःला समर्पित केले. आपले संविधान हा आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाचा भक्कम पाया असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल, काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.
पुढे बोलतांना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, आपल्या संविधानात प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहेत. भारताची एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे, समाजात एकोपा वाढवणे, महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि राष्ट्राला उच्च पातळीवर नेणे यांचा नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश आहे. राज्यघटनेची जी भावना आहे त्यानुसार सर्वसामान्य लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी कार्यपालिका, कायदे मंडळ आणि न्यायपालिका यांची एकत्रितपणे काम करण्याची जबाबदारी आहे. संसदेने बनवलेल्या अनेक कायद्यांमध्ये लोकांच्या आकांक्षा अभिव्यक्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत सरकारने समाजातील सर्व घटकांच्या, विशेषत: दुर्बल घटकांच्या विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत,असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, आपली राज्यघटना हा एक जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे. दूरदृष्टी असलेल्या आपल्या संविधान निर्मात्यांनी काळाच्या बदलत्या गरजांनुसार नवनवीन कल्पना अंगीकारण्याची तरतूद असलेली प्रणाली उपलब्ध केली. आपल्या संविधान निर्मात्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे दिशानिर्देश दिले होते. आज आपला देश एक आघाडीची अर्थव्यवस्था बनण्याबरोबरच ’विश्‍वबंधू’ म्हणून ही भूमिका अतिशय उत्तमरित्या बजावत आहे. सर्व नागरिकांनी आपल्या आचरणात घटनात्मक आदर्श आत्मसात करण्याचे, मूलभूत कर्तव्यांचे निर्वहन करण्याचे आणि 2047 पर्यंत ’विकसित भारत’ निर्माण करण्याच्या राष्ट्रीय ध्येयाकडे समर्पित भावनेने अग्रेसर होण्याचे, आवाहन राष्ट्रपतींनी केले

COMMENTS