Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या अध्यक्ष सचिव यांचे कट कारस्थान चालूच ?

समायोजीत मागासवर्गीय कर्मचाऱ्याचा मागीतला खुलासा: संस्थेने केले नियमबाह्य कार्यमुक्त

बुलढाणा- बुलढाणा येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलडाणाच्या वतीने अस्थिव्यंग निवासी विद्यालय,मूकबधिर निवासी विद्यालय, अंध निवासी विद्

विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभेच्या मैदानात
दारूच्या दुकानावर चोरांचा डल्ला, दीड लाख रुपये लंपास | LOKNews24
हुंड्यासाठी तरूणीवर पेट्रोल टाकुून जिवंत जाळले | LOKNews24

बुलढाणा- बुलढाणा येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलडाणाच्या वतीने अस्थिव्यंग निवासी विद्यालय,मूकबधिर निवासी विद्यालय, अंध निवासी विद्यालय चालविण्यात येत आहेत.मात्र सदर संस्थेचे अध्यक्ष डॉ एस.एम.छाजेड आणि साचिव जे. बी.जयवार यांचा जातीय द्वेष आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यान बाबतीत कायम कटकारस्थान चालूच असतात.हे कट कारस्थान थांबताना दिसत नाही. त्याचा बळी आता मूकबधिर निवासी विद्यालयातील मागासवर्गीय काळजी वाहक पांडूरंग बनसोडे पडला असल्याने बनसोडे यांनी बहुजन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व सचिव रावसाहेब कांबळे व डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली असून न्यायाची अपेक्षा केली आहे.तर बनसोडे यांनी सदर तक्रारीत नमूद केले आहे की 

आयुक्त दिव्याग कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क्र. अकआ/प्र. सर्व / कावा / बनसोडे / अति कर्म समा / २०१६-१७/२९६३ पुणे दि. २६ जुलै २०१६ नुसार दि. २२/०८/२०१६ रोजी अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था, बुलडाणा द्वारा संचालित मुकबाधिर निवासी विद्यालय, बुलडाणा येथे काळजीवाहक पदावर रुजू झाले आहे.

त्यांची मुळ शाळा जय शंकर निवासी अपंग विद्यालय जळकोट, ता.जळकोट, जि. लातूर ही शाळा २०११ पासून बंद पडलेली आहे. कालांतराने १२फेब्रुवारी २०१४ रोजी सदरहू शाळा महाराणा अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नेरुळ या संस्थेला हस्तांतरण होऊन मौजे कुमठे ता. तासगाव जि. सांगली या ठिकाणी स्थलांतरित झालेली आहे.

सदरहू हस्तांतरित संस्थेच्या अध्यक्ष महादेव बाबा पुकळे यांनी जावक क्र. २७२ /२०२३ दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार मुख्याध्यापक मुकबधिर निवासी विद्यालय, बुलडाणा यांना बनसोडे यांचा लेखी खुलासा मागीतलेला आहे, परंतु मुख्याध्यापिका गीतांजली मुंढे यांनी कुठल्याही प्रकारचे लेखी पत्र न देता त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात मागितले नाही, त्यांचा कोणताही खुलासा घेतला नसताना संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी नियमबाह्य त्यांच्या सहीनिशी कार्यमुक्त पत्र दिले आहे. त्या मुळे बनसोडे यांचा मनस्ताप वाढला आहे. तर बनसोडे हे 

दि. २२ ऑगस्ट २०१६ पासून बुलडाणा येथे स्थायिक झालेले आहे तसेच त्यांच्यावर दोन बँकेचे कर्ज आहे. तसेच १०,२०,३० च्या वेतन श्रेणीचे काम थकीत आहे, जिपिएफ चे काम सुद्धा थकीत आहे. त्यामुळे बनसोडे हे सदरहू हस्तांतरित झालेल्या शाळेत रुजू होण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र 

सदर पत्रान्वये माझ्यासाठी कोणताही आदेश प्राप्त नसतांना केवळ मी मातंग समाजाचा असल्यामुळे सदर शाळेचे अध्यक्ष डॉ एस एम छाजेड, सचिव जे बी जयवार यानी मला हाकलून लावण्याकरिता माझ्या विरोधात षडयंत्र रचून मला संस्थाचालकांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता केवळ जातीय द्वेषामुळे कार्यमुक्त केलेले आहे. तर 

यापूर्वी जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अमरावतीचे अमोल यावलीकर यांनी समायोजित कर्मचारी मोहन ठाकरे यांना विशेष शिक्षक पदावरून कार्यमुक्त करणे बाबत पत्र दिले असता मोहन ठाकरे यांच्या पत्रावर सदर जातीयवादी संस्थाचालक यांनी कोणतीही कार्यवाही संस्थेने केलेली नाही परंतु हस्तांतरित संस्थेने माझा फक्त लेखी खुलासा मागितला असतांना माझे कोणतेही म्हणणे एकून न घेता मला प्रत्यक्षात कार्यमुक्त केले.

ही कार्यवाही केवळ आणि केवळ जातीय द्वेषातून केलेली दिसून येते. माझे म्हणणे एकून न घेता माझी नोकरी संपुष्टात आणलेली आहे. त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तरी मला योग्य तो न्याय मिळवून देण्यात यावा असे आपल्या तक्रारीत बनसोडे यांनी नमूद केले आहे.तर या संस्था चालकांच्या या कायदाबाह्य कार्यमुक्तचा आदेश दिल्यामुळे व मुख्यध्यापीका मुंढे यांच्या कारभारात अध्यक्ष सचिव हस्तक्षेप करत आहेत त्या मुळे संपुर्ण दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मात्र हे प्रकरण बहुजन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने अतिशय गांभीर्याने घेतले असून संघटना मात्र बनसोडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची माहिती रावसाहेब कांबळे यांनी दिली आहे.

COMMENTS