नवी दिल्ली ः प्राप्तिकर विभागाने वेळेत आयटी रिटर्न न भरल्याचे कारण पुढे करत काँगे्रसचे बँक खाते गोठवले होते. त्यानंतर काँगे्रसकडून सत्ताधार्यांव
नवी दिल्ली ः प्राप्तिकर विभागाने वेळेत आयटी रिटर्न न भरल्याचे कारण पुढे करत काँगे्रसचे बँक खाते गोठवले होते. त्यानंतर काँगे्रसकडून सत्ताधार्यांवर टीकची झोड उठवण्यात येत होती. हा लोकशाहीवरील हल्ला असून, देशात निवडणूका होऊच नये यासाठी काँगे्रसचे खाते गोठवण्यात आल्याचा सूर आळवण्यात येत होता, मात्र काही तासानंतरच काँगे्रसचे गोठवलेले खाते पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.
प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाने शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता काँग्रेसची खाती गोठवण्यावरील बंदी उठवली आहे. तासाभरापूर्वी काँग्रेसने पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आयकरने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रुपयांची रिकव्हरी मागितली आहे. आम्हाला गुरुवारी माहिती मिळाली की बँकांनी पक्षाने दिलेले धनादेश थांबवले आहेत. ते आमचे चेक क्लिअर करत नाहीत. काँग्रेस पक्षाची खातीही गोठवण्यात आली आहेत. याशिवाय क्राउड फंडिंग खातीही गोठवण्यात आली आहेत. सध्या आमच्याकडे वीज बिल भरण्यासाठी आणि कर्मचार्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. खाती गोठवल्यामुळे केवळ भारत जोडो न्याय यात्राच नाही, तर पक्षाच्या सर्व राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे. हे लोकशाही गोठवण्यासारखे असल्यासारखेच म्हटले होते.
भविष्यात निवडणुकाच होणार नाहीत ः खरगे – काँगे्रसचे खाते गोठवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनाक्रमावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात देशात निवडणुकाच होणार नाहीत हे आम्ही म्हणूनच आतापर्यंत सांगत होतो, असे खरगे यांनी म्हटले आहे. सत्तेच्या नशेत असलेल्या मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खाती गोठवली आहेत. हा लोकशाहीला मोठा धक्का आहे, असे खरगे यांनी म्हटले आहे.
COMMENTS