Homeताज्या बातम्यादेश

काँगे्रसमुळे देशाची प्रतिमा डागाळली ः अर्थमंत्री सीतारामण

यूपीए सरकारने अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

नवी दिल्ली ः लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात श्‍वेतपत्रिका सादर केल्यानंतर शुक्रवारी चर्चे दरम्यान निर्मला स

जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी नको : छगन भुजबळ
न्यू मानस गुरुकुलात लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप…!
मुंबई उच्च न्यायालयात 7 लाख खटले प्रलंबित

नवी दिल्ली ः लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात श्‍वेतपत्रिका सादर केल्यानंतर शुक्रवारी चर्चे दरम्यान निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेने आता पाचव्या क्रमांकावर झेप घेतल्याचे सांगितले. मात्र काँगे्रसमुळे देशाची प्रतिमा डागाळली होती, अनेक भ्रष्टाचारामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली होती, मात्र आमच्या एनडीए सरकारने ही प्रतिमा पुसत अर्थव्यवस्थेला एका उंचीवर नेल्याचे सीतारामण यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलतांना सीतारामण म्हणाल्या की, यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक अवस्थेत होती. आम्ही आमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात ही अर्थव्यवस्था जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आणून ठेवली आहे. जी श्‍वेतपत्रिका आम्ही मांडली आहे ती जबाबदारीने मांडली आहे. ही एक गंभीर बाब आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. एनडीच्या कार्यकाळात देशाने आर्थिक स्तरावर चांगली प्रगती केली. सरकार योग्य पद्धतीने चालवण्याची नियत असेल तर अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावतोच. जे आमच्या काळात झाले आहे. यूपीएच्या काळात राष्ट्रकुल स्पर्धांचा घोटाळा, कोळसा घोटाळा असे किती तरी घोटाळे झाले. त्यामुळे देशाची प्रतिमा डागाळली. यूपीएच्या कार्यकाळात हे घोटाळे झाले. अर्थमंत्री पुढे म्हणाल्या जर आमच्या अधिवेशनात विरोधकांना चर्चा घडवून आणायची असेल तर आमची काहीही हरकत नाही. मात्र विरोधी पक्षाकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही. ते फक्त गदारोळ घालतात. यूपीए काळात कोळसा घोटाळा झाला त्यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले. देशात दीर्घ काळ कुठलाही नवा रोजगार निर्माण होऊ शकला नाही. देशाला कोळसाही बाहेरुन मागवावा लागत असे. मोदी सरकार सत्तेवर असताना कोव्हिडचे संकट आलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणी निर्णयांमुळे या संकटाचाही आपण सामना केला आणि अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमाकांवर आणली. तसंच आपण अजूनही आपल्या अर्थव्यवस्थेला बळ देत आहोत. आजचा विरोधी पक्ष हा मगरीचे अश्रू ढाळतो आहे. मात्र कोळसा घोटाळ्यात कुणाचे हात काळे झाले? ते जरा बघा असा बोचरा सवालही सीतारामण यांनी केला आहे.

COMMENTS