काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना सांभाळलं पाहिजे – राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना सांभाळलं पाहिजे – राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ 

नाशिक प्रतिनिधी - महाविकास आघाडीच्या पक्षाने त्यांच्या नेत्यांना तसेच काँग्रेसने देखील त्यांच्या नेत्यांना सांभाळले पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी

एकता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे डॉ. मनिष चौकशी यांचे व्याख्यान
बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप
हृतिक रोशन आणि सबा आझाद अडकणार लग्नबंधनात ?

नाशिक प्रतिनिधी – महाविकास आघाडीच्या पक्षाने त्यांच्या नेत्यांना तसेच काँग्रेसने देखील त्यांच्या नेत्यांना सांभाळले पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर तांबे यांच्या येवल्यातील सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या हे बघण्यापेक्षा शुभांगी पाटील यांच्या तिच्या भरवाव्यात व मतपेटीत भरघोस मतदान करावे असे भुजबळ म्हणाले. काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे येवला दौऱ्यावर आले त्यावेळी  युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी दिसते याबाबत भुजबळ विचारले असता भुजबळ म्हणाले की.. ते पहिले काँग्रेसचे नेते होते त्यामुळे इतरही महाविकास आघाडीच्या पक्ष्यांनी तसेच काँग्रेस पक्षांनी त्यांच्या नेत्यांना सांभाळावे असे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.  पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या येवल्यातील सभेला खुर्च्या रिकाम्या होतात याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की कोणाच्या खुर्च्या रिकाम्या आहेत हे बघण्यापेक्षा शुभांगी पाटील त्यांच्या खुर्च्या भरवाव्यात अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. 

COMMENTS