Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा – माजी मंत्री डी पी सावंत 

नांदेड प्रतिनिधी - सर्व सरकारी कर्मचाऱ्याचा मोर्चा आयटीआय कॉर्नर पासून जिल्हाधिकारी कार्यल्यावर धडकला. परिणामी सर्वच शासकीय कार्यालयात आज

शेतकर्‍यांच्या हिताची संपुर्ण माहिती त्यांना मिळावी-शरद झाडके  
राहुरीत संताजी महाराजांची जयंती उत्साहात
मुंबई-पुणे रेल्वे सेवा सोमवारपर्यंत बंद

नांदेड प्रतिनिधी – सर्व सरकारी कर्मचाऱ्याचा मोर्चा आयटीआय कॉर्नर पासून जिल्हाधिकारी कार्यल्यावर धडकला. परिणामी सर्वच शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सर्व सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत.

या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. 2005 मध्ये केंद्रीय स्तरावर निर्णय घेऊन भाजप सरकारने पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आणि सर्व राज्य सरकारना तो मान्य करावा लागला होता. पण आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विचार करुन निर्णय घ्यावा, असे डी. पी सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देत सर्व सरकारी कर्मचारी एकत्रित आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू केली जावी. अन्यथा हे आंदोलन असेच चालू राहील, सर्व कर्मचारी आक्रमक आहेत. 

COMMENTS